सुनिल कांबळे यांचे निधन*

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल* * * ** *



 


माहिती व जनसंपर्क कार्यालय पुणे महानगरपालिका दि. १०/६/२०२०


 


'कृपया प्रसिद्धीसाठी


 


*पुणे :-* पुणे महानगरपालिकेतील कर आकारणी कर संकलन विभागातील कर्मचारी सुनिल तात्याराम कांबळे वय वर्षे ५६ यांचे मंगळवारी उपचारा दरम्यान निधन झाले.


 


धानोरी येथील स्मशानभूमीत बुधवारी दुपारी त्यांचे पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


 


त्यांचे पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.


 


रविवारी दुपारी धानोरी येथे अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे अपघात झाला होता. जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार चालू असताना मंगळवारी दुपारी त्यांचे निधन झाले. त्यांचे निधनानिमित्त पुणे मनपाच्या विविध विभागातील कर्मचारी, अधिकारी, मनपा कर आकारणी व कर संकलन विभाग, मनपा प्रेसमधील सहकारी व ताडीवाला रस्ता, विश्रांतवाडी धानोरी परिसरातील नातेवाईक मित्रपरिवार यांना मोठा धक्का बसला व अनेकांची मने हेलावली, अनेक सहकारी हळहळ व्यक्त करीत होते.


 


सुनिल कांबळे पुणे महानगरपालिकेच्या मनपा मुद्रणालयात १९९३ साली "फोरमन" या पदावर कायम स्वरुपी सेवेत रुजू झाले. मनपाच्या कर आकारणी व कर संकलन विभागातील मिळकतींचे फॉर्म अद्ययावत करणेकामी तसेच संगणकीय कामकाजाच्या कौशल्यावर व प्रिंटींग क्षेत्रातील सखोल ज्ञान व प्रदीर्घ अनुभव असल्याने त्यांनी मिळकतींची बिले व संगणकीय सुधारणा करण्यात त्यांनी मोलाची कामगिरी केली. इतरांना व मनपात येणाऱ्या नागरिकांना त्यांनी सातत्याने मार्गदर्शन केले.


 


सतत हसतमुख व हसरा चेहरा व सर्वांशी सलोख्याचे संबंध असल्यामुळे त्यांचा चाहता वर्ग व मित्र परिवार मोठा होता.


 


माहिती व जनसंपर्क अधिकारी पुणे महानगरपालिका