पुणे प्रवाह न्युज पोर्टल
पुणे दि. 8 : सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत 5 कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत 1 कॅम्प असे पुणे विभागात एकुण 6 रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत. या कॅम्पमध्ये 154 स्थलांतरित मजूर असून 154 मजुरांना भोजन देण्यात येत आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
( टिप : - सदरची आकडेवारी दुपारी 1.30 वा.पर्यंतची आहे)