पुणे प्रवाह न्युज पोर्टल
पुणे, ता. २८ जुलै : पुणे आणि महाराष्ट्रातील आघाडीचे साप्ताहिक पुणे प्रवाह यांच्या वतीने देण्यात येणार कोविड महायोद्धा पुरस्कारासाठी सामाजिक कार्यकर्ते आणि पुणे महापालिकेचे स्वीकृत नगरसेवक प्रभाकर पवार यांना जाहीर करण्यात आला आहे. संपादक संतोष सागवेकार यांनी ही माहिती कळविली आहे.
गोखलेनगर, जनवाडी, वडारवाडी, रामोशिवाडी, वैदू वाडी, जनता वसाहत, पोलीस लाईन, बहिरटवाडी, हौसिंग बोर्ड कॉलोनी या परिसरात कोविड स्थितीत श्री. पवार यांनी मोठे सामाजिक कार्य केले आहे.
कोविड विषयी जनजागृती, आरोग्य शिबिरांचे आयोजन, मास्क व सॅनिटायझर वाटप, गरिबांना शिधा किटचे वाटप, भाजी वाटप, स्वच्छता उपक्रम, औषध फवारणी, कोरोनाग्रस्त भाग सील करणे आदी कार्य श्री. पवार यांनी केले आहे.
श्री. पवार यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल समाजाच्या विविध स्तरावरून त्यांच्या वर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या पुरस्कारासाठी शहराच्या विविध भागांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले होते.