पुणे प्रवाह न्युज पोर्टल
पुणे : मराठी विज्ञान परिषद पुणे विभागाच्या वतीने 'लॉकआऊटनंतरच्या मूलभूत समस्या व निराकरण' या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले आहे. गुरुवार, दि. ११ जून २०२० रोजी सायंकाळी ६.३० वाजता गुगल व्हर्च्युअल बोर्डरुमवरून या परिसंवादाचे प्रक्षेपण होणार आहे. श्रोत्यांना https://meet.google.com/frd-afhg-vwq या लिंकवरून या परिसंवादात सहभागी होता येईल.
या परिसंवादात 'मानसिक ताण' यावर मानसोपचारतज्ज्ञ आरती पेंडसे बोलणार आहेत. मानसिक तणाव दृश्य आणि अदृश्य असला तरी त्याची दखल आपल्या संस्कृतीत सहज घेतल्या जात नाही. लॉकआऊट संपल्यानंतर मानसिक समस्या व त्याला सामोरे कसे जायचे, याबद्दल त्या सांगणार आहेत. कौटुंबिक समस्याबाबत माजी समाज कल्याण आयुक्त शशिकांत सावरकर, ज्योती पठानिया बोलणार आहेत. जीवनोपयोगी वस्तूची उपलब्धता याविषयी पुणे मर्चन्ट चेम्बर्सचे सचिव विजय मुथा माहिती देणार आहेत. तर श्रद्धास्थाने या विषयावर श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान, पंढरपूरचे सदस्य शिवाजीराव मोरे बोलणार आहेत.