एक्सपे.लाइफची मे महिन्यात डिजिटल पेमेंटद्वारे ६० हजार व्यवहारांची नोंद

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 



 


~ १४२ टक्क्यांच्या महसूल वाढीसह ३ कोटींची कमाई ~


 


मुंबई, ९ जून २०२०: एक्सपे.लाइफ हा एनसीपीआय मान्यताप्राप्त बहुउद्देशीय बिल पेमेंट मंच असून तो ग्राहकांना वन स्टॉप सोल्युशन पुरवतो. या कंपनीने मे महिन्यात डिजिटल पेमेंट्सच्या माध्यमातून ६० हजारांपेक्षा जास्त व्यवहारांची नोंद केली असून १४२ टक्क्यांच्या वाढीसह ३ कोटी रुपयांचा महसूल जमवला आहे . ब्लॉकचेन आधारीत ट्रान्झॅक्शन फ्रेमवर्कद्वारे समर्थित असलेल्या या कंपनीने नोंदवले की यातील बहुतांश व्यवहार वीज बिलांच्या देयकांसाठी करण्यात आले. इतर कॅटेगरीजपैकी २३ लाख रुपयांचे व्यवहार मोबाइल व्हॅनमधून करण्यात आले.


 


नॉन कंटेनमेंटेड झोन्समध्ये अत्यावश्यक सेवांसाठी निर्बंध मे महिन्यात शिथिल करण्यात आले होते. त्यामुळे एनपीसीआय मान्यताप्राप्त मंचावरील हळू हळू वाढ झाली असून त्यात ५.४ दशलक्ष रुपयांचे व्यवहार झाले. टिअर १ आणि टिअर २ शहरांतील २५३ बिलर्ससह कंपनीची टिअर ३ आणि टिअर ४ शहरांतही ५०,०००+ पिनकोडसह मजबूत उपस्थिती आहे. राज्यनिहाय वापरातही वाढ झाली असून पंजाबने एकूण व्यापाराच्या २८ टक्के वाटा उचलत पहिला क्रमांक लावला. त्यानंतर राज्स्थान, पश्चिम बंगाल,गुजरात आणि कर्नाटकचा क्रमांक लागला.


 


एक्सपे.लाइफचे संस्थापक व सीईओ रोहित कुमार म्हणाले, “सध्याच्या अनिश्चित काळात, भारतातील वेगाने विस्तारणारा बिल पेमेंट मंच म्हणून ग्राहकांना वन स्टेप सोल्यूशन पुरवून त्यांचे जीवन सोपे करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. आम्ही डिजिटल पेमेंटचा लाभ देशातील बँकिंगची सुविधा न घेणाऱ्या लोकांपर्यंत पुरवण्यासाठी तसेच वित्तीय समावेशन करण्याच्या उद्देशाने एनपीसीआयबरोबर आमची भागीदारी आहे.”