*सुशिक्षीत बेरोजगार म्हणून नावनोंदणी केलेल्या उमेदवारांनी* *आपल्या नोंदणी क्रमांकास आधार क्रमांक जोडून नोंदणी अद्यावत करावी* *-सहायक आयुक्त अनुपमा पवार*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


*सुशिक्षीत बेरोजगार म्हणून नावनोंदणी केलेल्या उमेदवारांनी* 


*आपल्या नोंदणी क्रमांकास आधार क्रमांक जोडून नोंदणी अद्यावत करावी*


                                                      *-सहायक आयुक्त अनुपमा पवार*


 


        पुणे, दि. 12 : सुशिक्षीत बेरोजगार म्हणून नावनोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपल्या नोंदणी क्रमांकास आधार क्रमांक जोडून नोंदणी अद्यावत करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त अनुपमा पवार यांनी केले आहे.


  ज्या उमेदवारांनी शासनाच्या पूर्वीच्या रोजगार व स्वयंरोजगार व सध्याच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या कार्यालयात यापूर्वी सुशिक्षीत बेरोजगार म्हणून नावनोंदणी केलेली आहे परंतू अद्याप आपल्या नोंदणीचे अपडेशन व आपल्या नोंदणी क्रमांकास आपला आधार क्रमांक जोडलेला नाही अशा सर्व उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाइट वर जावून Job Seeker option मध्ये आपला नोंदणी क्रमांक व पासवर्ड टाकून नोंदणी अद्यावत करावी. अन्यथा आपली नोंदणी 15 ऑगस्ट 2020 अखेर रदद होईल.


  अपडेशन अभावी आपली नोंदणी रद्द झाल्यास आपणास या विभागामार्फत मिळणा-या सुविधांचा भविष्यात लाभ घेता येणार नाही. तरी तात्काळ आपली नोंदणी 15 ऑगस्ट 2020 पूर्वी अद्यावत करावी, असेही आवाहन सहायक आयुक्त अनुपमा पवार यांनी केले आहे.


०००००