पुणे प्रवाह न्युज पोर्टल
कृपया प्रसिद्धीसाठी 8 जुलै 2020
महाराष्ट्रातील खासगी विद्यापीठांच्या प्रवेशांसाठी
पुणे, ता. 08 :- कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे सरकारने एमएच-सीईटीसंदर्भात (सामान्य प्रवेश परीक्षा) निर्णय पुढे ढकलली आहे. तसेच जेईई सीईटी परीक्षा सप्टेंबरमध्ये घेण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र खासगी विद्य़ापीठांच्या प्रवेश प्रक्रियाला गती देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या राज्यातील विविध 19 खासगी विद्यापीठांची संघटना 'पेरा' (प्रिमीयंट एज्युकेशन अँड रिसर्च असोसिएशन) यांनी विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन पेरा सीईटी - 2020 च्या परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. ही सीईटी 31 जुलै रोजी सुरू होणार असून 2 ऑगस्ट 2020 रोजी संपणार होणार आहे. या परीक्षांचा निकाल 5 ऑगस्ट रोजी जाहीर केले जाईल, अशी माहिती पेरा इंडियाचे अध्यक्ष आणि एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष व प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड आणि पेरा इंडियाचे उपाध्यक्ष श्री. भारत अग्रवाल यांनी दिली.
प्रा. डॉ. मंगेश कराड म्हणाले, महाराष्ट्र शासनाने 19 खासगी विद्यापीठांना मान्यता दिली आहेत आणि ती आज राज्यभर कार्यरत आहेत. खाजगी विद्यापीठांच्या कायद्यानुसार सरकारी एजन्सीद्वारे घेण्यात आलेल्या सीईटी व्यतिरिक्त खासगी विद्यापीठांच्या संघटनेने घेतलेल्या सीईटीच्या आधारे विद्यार्थ्यांना विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेता येऊ शकतो. यावर्षी कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे एमएच-सीईटी कधी होईल याची शाश्वती नाही. त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश प्रक्रियेला गती देण्यासाठी पेरा या खासगी विद्यापीठाच्या संघटनांनी 31 जुलै, 1 आणि 2 ऑगस्ट २०२० रोजी सीईटी - 20 ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतला आहे. पेरा सीईटीच्या आधारे विद्यार्थी खाजगी राज्य विद्यापीठांमध्ये प्रवेश अर्ज करून प्रवेश निश्चित करू शकतात.
पेरा सीईटी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल. पेरा सीईटी परीक्षेच्या ऑनलाइन नोंदणीची अंतिम तारीख 28 जुलै आहे. विद्यार्थ्यांना या सीईटी संदर्भात ऑनलाइन परीक्षा पद्धती समजून घेण्यासाठी 26 व 27 जुलै रोजी मॉक परीक्षा घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना उमेदवार घरातूनच ही सीईटी परीक्षेस देता येणार आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी www.peraindia.in च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे ही प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी सांगितले.