पहिल्या विश्वस्तरीय 'शिवराज्याभिषेक मनामनात शिवराज्याभिषेक घराघरात' स्पर्धेचा निकाल जाहीर-
शिवजयंती महोत्सव समिती, पुणे चा अभिनव उपक्रम ; पुणे, भारतासह जगभरातून स्पर्धकांचा सहभाग
पुणे : शिवजयंती महोत्सव समिती, पुणे तर्फे आयोजित पहिल्या जागतिक स्तरावरील शिवराज्याभिषेक मनामनात शिवराज्याभिषेक घराघरात या स्पर्धेत भारतातील व भारताबाहेरील अशा २३ कुटुंबांनी विजेतपद पटकाविले. भारतासह दुबई, अबुधाबी, सिंगापूर, अमेरिका, कॅनडा, आॅस्टेÑलिया आदी देशांतील भारतीयांनी आपापल्या घरामध्ये शिवराज्याभिषेकाविषयी सजावट करुन हा उत्सव साजरा केला.
शिवजयंती महोत्सव समितीतर्फे सालाबाद प्रमाणे यंदाही शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र, कोरोना व लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर विश्वव्यापी पहिल्या शिवराज्याभिषेक मनामनात शिवराज्याभिषेक घराघरात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. समितीचे प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांनी या स्पर्धेचे आयोजन केले.
अमित गायकवाड म्हणाले, समितीतर्फे सन २०१३ पासून समितीच्या वतीने स्वराज्यगुढीची संकल्पना राबविण्यात येते. संकल्पनेचे यंदा ८ वे वर्ष असून प्रथमच या संकल्पनेला जागतिक स्तरावर स्पर्धेचे स्वरुप देण्यात आले आहे. शिवराज्याभिषेक म्हणजे शौर्याचे, पराक्रमाचे, अभिमानाचे, तेजाचे प्रतिक आणि शिवशक प्रारंभाचा स्वराज्य नववर्षाचा पहिला दिवस. त्यामुळे हा दिवस सण व महोत्सवाप्रमाणे घराघरात साजरा व्हावा, ही यामागील संकल्पना होती. स्पर्धेत सहभागी झालेल्या शिवप्रेमींनी स्वराज्यगुढी भगव्या स्वराज्यध्वजासह घरोघरी उभारुन शिवरायांचे तैलचित्र, पुतळा, रंगावली, फुले वा आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करुन आकर्षक सजावट केली. तसेच पारंपरिक पोशाख परिधान करुन घरात गोडधोड बनवून सहकुटुंब हा दिन साजरा केला.
अ गट (भारतातील विजेते) - जयाजी वामनराव बाजी मोहिते (पुणे), आर्य महेश पवार (जळगाव), प्रसाद संजय सुपेकर (पुणे), राजेश पाटील (कोल्हापूर), प्रवीणराजे महाडिक, तुषार गव्हाणे, रोहितराजे घोरपडे, निलेश जगताप, अनिता मुकेश भोकरे, ओवी गव्हाणे, मयुर शिळीमकर (पुणे), रोहित वनिता शांताराम जाधव (सातारा), ओंकार अविनाश कदम (पुणे), विनय भाट (पिंपरी चिंचवड), समर्थ हनुमंत काळे, रुद्रा रवींद्र लिंबोरे (पुणे).
गट ब (भारताबाहेरील विजेते) - नारायणी ढोले (सिंगापूर), शौर्य संभाजी महाडिक (मेलबर्न, आॅस्ट्रेलिया), अनेरी योगेश वाडकर (म्युनिच, जर्मनी), निलेश साळुंके (इंग्लंड), आशिष कलढोणे आणि परिवार (अबूधाबी, संयुक्त अरब अमिरात), अमोल शिवाजी कोचले (दुबई, संयुक्त अरब अमिरात).
*फोटो ओळ : शिवजयंती महोत्सव समिती, पुणे तर्फे आयोजित पहिल्या विश्वस्तरीय शिवराज्याभिषेक मनामनात शिवराज्याभिषेक घराघरात या स्पर्धेत भारतासह दुबई, अबुधाबी, सिंगापूर, अमेरिका, कॅनडा, आॅस्टेÑलिया आदी देशांतील भारतीयांनी घरामध्ये सजावट करुन हा उत्सव साजरा केला. त्यातील विजेत्या कुटुंबांची क्षणचित्रे.