पुण्याचे प्रथम नागरिक मा. मुरलीधर मोहोळ महापौर यांना कोरोनाची लागण

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



पुणे : पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्वतः याबाबत ट्विट करत माहिती दिली. मुरलीधर मोहोळ यांना ताप आल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. ही चाचणी आज पॉझिटिव्ह आली आहे. त्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली “थोडासा ताप आल्याने मी माझी #COVIDー19 टेस्ट केली असता, ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती स्थिर असून लवकरच बरा होऊन पुन्हा तुमच्या सेवेत असेल. उपचारादरम्यान सर्व यंत्रणांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत राहील”, असं ट्विट महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केलं आहे.