सायबर धोके रोखण्यासाठी क्विक हीलची अद्ययावत प्रणाली

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 



 


~ डिजिटल डेटा संपूर्णपणे अबाधित ठेवणारी 'प्रायव्हसी प्रोटेक्शन परफॉर्मन्स' संकल्पना ~


 


मुंबई, १४ जुलै २०२०: ग्राहक, व्यवसाय व सरकारी यंत्रणेला सायबर सिक्युरिटीतील सर्वोत्तम सुविधा पुरवणा-या क्विक हील टेक्नॉंलॉजीने अत्यंत परिणामकारक अशी सर्वांत अद्ययावत प्रणाली बाजारात आणण्याची घोषणा केली. ग्राहकांची सुरक्षा जपणारी व सर्व डिजिटल डेटा संपूर्णपणे अबाधित ठेवणारी अशी ही 'प्रायव्हसी प्रोटेक्शन परफॉर्मन्स' संकल्पना आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्याचे देशातील व जागतिक वातावरण आणि कालसुसंगत सायबर धोके लक्षात घेऊन क्विक हीलने ही प्रणाली विकसित केली आहे. ह्याअंतर्गत ग्राहकांना सर्वोत्तम सेवा व संपूर्ण सुरक्षितता देत अव्याहत ब्राऊजिंगची खात्री मिळते.


 


ही प्रणाली डेटा मर्यादेचे उल्लंघन होताच ऑनलाइन ट्रॅकर्स वापरकर्त्याच्या ऑनलाइन वर्तनविषयी माहिती मिळविण्यास डेटा मायनर्सना सक्षम करतात आणि वैयक्तिक आणि आर्थिक माहिती चोरतात यामुळे वापरकर्त्याची गोपनीयता धोक्यात येते. क्विक हीलच्या या प्रणालीत अशा ट्रॅकर्सना ब्लॉक केले जाते व त्यायोगे ग्राहकाची वेब हिस्टरी (सर्च पॅटर्न, कोणत्या वेबसाइटवर किती वेळ घालवला, इत्यादी), वैयक्तिक माहिती (वय, लिंग, कुटुंबातील सदस्य) आणि आर्थिक (गुंतवणूक, बँक डिटेल्स, क्रेडिट कार्ड्स) गोष्टींची गुप्तता पाळली जाते. या व्यतिरिक्त 'पॅरेंटल कंट्रोल' या वैशिष्ट्यात पालक आपल्या मुलांच्या ऑनलाईन ऍक्टिव्हिटीजवर लक्ष ठेऊ शकतात; तर वेबकॅम प्रोटेक्शन मध्ये वेबकॅममधून वेबकॅम हॅक करून नजर ठेवणाऱयांवर आळा घातला जातो. या वैशिष्ट्यांमुळे अशा धोक्यांवर निश्चितपणे प्रतिबंध घालता येतो.


 


वाढत्या रन्समवेअर धोक्यांपासून बचावासाठी क्विक हीलचे अत्याधुनिक 'अँटीरन्समवेअर प्रोटेक्शन' हे पेटंटेड तंत्र ग्राहकांच्या सायबर सुरक्षेची काळजी घेते. तसेच याद्वारे डेटा मर्यादा उल्लंघल्यामुळे गेलेला डेटाही पुनर्प्राप्त करता येतो. 'सिग्नेचरलेस बिहेवियर डिटेक्शन' ह्या पेटंटेड तंत्राच्या सहाय्याने आर्टिफिशियल इंटेलिजंस व मशिन लर्निंग मध्ये झिरो-डे मालवेअरचे निदान करण्यास मदत होते.


 


सध्याच्या काळात मुख्यतः वर्क फ्रॉम होम करणा-यांसाठी मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटर, स्मार्ट टीव्ही चालवण्यासाठी वायफाय राऊटर अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे हॅकर्सना फक्त राऊटरला लक्ष्य करणे पुरेसे आहे. नेमके इथेच क्विक हीलचे 'वायफाय स्कॅनर' हे अत्याधुनिक वैशिष्ट्य उपयोगी ठरेल. हा स्कॅनर वायफाय नेटवर्क तपासून संभाव्य धोक्यांचे तत्काळ निदान करतो. त्यामुळे ग्राहकाला धोकादायक बाबी ओळखून त्या सोडवणे व संपूर्ण सुरक्षित नेटवर्क मिळवणे शक्य होते.


 


याशिवाय 'क्लाऊड बेस्ड इमेल सिक्योरिटी' या वैशिष्ट्यामुळे स्पॅम व पुशमेल्सवर निर्बंध येतो तर 'सेफ बँकिंग' आणि 'वेब सिक्योरिटी' या वैशिष्ट्यांमुळे ग्राहकाला ब्राऊजिंग आणि बँकिंग करताना गुप्तता व सुरक्षिततेची हमी मिळते. कमीत कमी संसाधनांसह जास्तीत जास्त सुरक्षितता हेच क्विक हीलचे ब्रीद राहिले आहे. पारंपरिक सिक्योरिटी पर्याय जसे डिव्हाइसचा वेग कमी करतात तसे या प्रणालीत होत नाही; याउलट ती डिव्हाइसच्या वेगाला जराही धक्का न लावता उत्कृष्ट कामगिरी करते.


 


क्विक हीलचे व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर म्हणाले 'आम्ही ग्राहकांना नेहमीच सायबर सिक्योरिटीतील सर्वात अद्ययावत तंत्रज्ञान दिले आहे. गेल्या काही वर्षांत स्वतःत सुधारणा करत आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग एएल व एमएल तंत्रज्ञानाचा वापर करत अत्याधुनिक सेवा आम्ही देत आहोत. तंत्रज्ञानातील विकासागणिक सायबर धोकेही वाढत आहेत. त्यामुळे आमची सेवा जास्तीत जास्त परिणामकारक करण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करतो. या नव्या प्रणालीने आमच्या ग्राहकांना संपूर्ण सुरक्षित सर्वोत्कृष्ट सेवा देण्याचा आमचा मानस आहे.