विद्यापीठ चौकातील "ते' पूल पाडण्यास सुरुवात; असे आहे पूल पाडण्याचे नियोजन...

पुणे प्रवाह न्युज पोर्टल



 


पुणे : लॉकडाऊनची संधी साधत विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल पूल मंगळवारपासून पाडण्यास सुरुवात झाली. एकावेळी न पाडता तीन टप्प्यात पाडण्याचा निर्णय पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने घेतला आहे. तीस दिवसात हे पूल पाडण्याचे नियोजन करण्यात आले असून वाहतूक कोंडीची टाळण्यासाठी चार पर्यायी रस्त्यांचा विचार करण्यात आला आहे.


 


हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान मेट्रो प्रकल्पाचे काम पीएमआरडीएने हाती घेतले आहे. गणेशखिंड रस्त्यावरून ही मेट्रो जाणार आहे. त्यासाठी या रस्त्यावरील पुणे विद्यापीठ आणि ई स्क्वेअर चौकातील उड्डाणपूल अडथळा ठरत आहेत. त्यामुळे हे दोन्ही पूल पाडण्याचे नियोजन पीएमआरडीएकडून करण्यात आले आहे.त्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. तर हे पूल महापालिकेच्या मालकीचे असल्याने ते पाडण्यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी महापालिकेकडूनही पीएमआरडीएला "एनओसी' देण्यात आली आहे.


 


दरम्यान कालरात्री महापालिका, वाहतूक पोलीस आणि पीएमआरडीचे अधिकारी यांची संयुक्तपणे विद्यापीठाची पाहणी केली. त्यावेळी मंगळवारपासून पूल पाडण्याससुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला .त्यानुसार आज सकाळपासून पूल पाडण्याच्या कामास सुरुवात झाली.


--------------


 


--------------


 


--------------


एकावेळी संपूर्ण पूल न पाडता, तीन टप्प्यात ते पाडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सर्वात कमी वाहतूक असलेल्या चतृशृंगी येथील, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात बाणेरकडे जाणारा आणि तिसऱ्या टप्प्यात औंधकडे जाणारा पूल पाडण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे पीएमआरडीकडून यावेळी सांगण्यात आले. पूल पाडताना वाहतूकीस अडथळा ठरू नये, यासाठी नियोजन करण्यात आले आहे. तसेच गणेशखिंड रस्त्यावर वाहतुक सुरळीत ठेवण्यासाठी चार पर्यायी रस्त्यांचा विचार करण्यात आला आहे. त्यांची देखील यावेळी पाहणी करण्यात आली.


 


असे आहे पूल पाडण्याचे नियोजन


 


पहिला टप्पात चतुशृंगी येथे उतारणारा व पाषाणकडे जाणारा भाग


दुसरा टप्पा बाणेरकडे जाणारा


तिसऱ्या टप्पा औंधकडे जाणारा