पुणे प्रवाह न्युज पोर्टल
अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मोफत सुविधा
अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी फोरसाईट स्कुल व भाजपा युवा मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे . ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थी आणि पालकांची होणारी धावपळ टाळण्यासाठी हि सुविधा उपलब्ध करून दिल्याची माहिती भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष आशिष सुर्वे व फोरसाईटचे प्रा . रवी पिल्ले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली .
या सुविधेचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी फोरसाईट स्कुल , वाय. एम. सी. ए. कॉम्प्लेक्स , क्वार्टर गेट , पुणे - ४११००१ व जे के एंटरप्रायजेस , श्रावस्ती नगर ,अनंत टॉकीज मागे , घोरपडी गाव , पुणे - ४११००१ येथे सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत आधारकार्ड व ऑनलाईन गुणपत्रिकासह संपर्क साधावा .
भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष आशिष सुर्वे