पुणे प्रवाह न्युज पोर्टल
पुणे - 'कोरोना'चा मुकाबला करताना शहरात रक्ताचा तुटवडा भासू लागला आहे. यासाठी रक्तदान शिबीरे घ्या असे आवाहन महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्र्यांनी केले आहे. त्याला प्रतिसाद देत पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सुहागमंगल कार्यालय बिबवेवाडी आज (रविवारी) दि ५ जुलै २०२० रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्यात ४३ जणांनी रक्तदान केले आणि सामाजिक कर्तव्य बजावले.
पुणे शहर काँग्रेसचे सरचिटणीस विश्वास दिघे, कसबा विधानसभा युवक काँग्रेस उपाध्यक्ष उर्मिला सोंडकर,पर्वती विधानसभा विध्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष केतन प्रकाश जाधव यांनी शिबीर आयोजित केले होते. शिबीरात जमा झालेले रक्त भरती हॉस्पिटल ब्लड बँक यांना देण्यात आले. या शिबीराला पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष रमेशदादा बागवे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अभयशेठ छाजेड, गटनेते आबा बागुल, अनिल सोंडकर, विजयराव मोहिते, शैलेंद्र नलावडे,भुषण रानभरे, द.स.पोळेकर, सुमित डांगी, सोनाली मारणे, इंदिरा अहिरे, रमेश सोनकांबळे, सतिश पवार, सुजित लाजुरकर, सचिन आडेकर व इतर पदाधिकारी यांनी भेटी दिल्या
कोरोनाच्या संकटाशी मुकाबला करण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या पातळीवर काम करीत आहे. काँग्रेसनेही रक्ताची गरज लक्षात घेऊन रक्तदान शिबीराचे आयोजन केले. गर्दी टाळण्यासाठी पाच-पाच जणांच्या गटाने पंधरा-पंधरा मिनिटांच्या अंतराने रक्तदान केले. तातडीने भरविलेले शिबीर कार्यकर्त्यांनी यशस्वी केले.