कोरोनाने घात केला अण्णाभाऊना मिळण्यासाठी भारतरत्न.... पी एम टी चे माजी चेअरमन भीमराव पाटोळे

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


कोरोनाने घात केला अण्णाभाऊना मिळण्यासाठी भारतरत्न..


अनेक वर्षापासूनचे आज ही प्रयत्न असे म्हणत पी एम टी चे माजी चेअरमन भीमराव पाटोळे यानी परत एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी,जेष्ट नेते आदरणीय शरद पवार,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. उध्दवजी ठाकरे,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,ना.प्रकाशजी जावडेकर,यानां अण्णाभाऊना भारतरत्न देण्यासाठी प्रयत्न करण्याची ईमेल द्वारे विनंती करुन साकडे घातले आहे.अनेक वर्षापासुन त्याकरिता मी प्रयत्न करत आहे.माजी राष्ट्रपती मा. प्रतिभाताई पाटील,माजी मुख्यमंत्री स्व.विलासरावजी देशमुख याना शिष्टमंडळमार्फत प्रत्यक्ष भेटून निवदने दिलेली आहेत.विलासरावजी देशमुख यानी तात्काळ केंद्राकडे शिफारस केली होती.तसेच आताचे राष्ट्रपती पंतप्रधान यानाही अनेकवेळा निवदने दिलेली आहेत.तसेच,पुणे शहरतील अनेक मान्यवर व्यक्तींच्या सह्यांचे निवेदन देऊन विनंती केलेली आहे.मातंग समाजातील अड. महेश सकट ,अड. राजश्री अडसुळ,जेष्ट कार्यकर्ते हनुमंत कांबळे यानी पत्रकार    


परिषद घेउन माझ्या मागणीसाठी जाहीर पाठिंबा दिला आहे.तसेच,27 जुलै 2019 रोजी मी विनंती केल्यानंतर खासदार मा.गिरीषजी बापट यानी केंद्रीय गृहमंत्री ना.अमित शहा यानि विनंती केली आहे.मी 4 मार्च 2020 ला पुढील प्रयत्नांसाठी दिल्लीला गेलो होतो.व ना.अमित शहा याना भेटण्याचे नियोजन होते. परंतू दोन दिवस मुक्काम करुन ते दिल्लीबाहेर असल्यामूळे भेट होऊ शकली नाही.


कारण महाराष्ट्र शासनाने 2010 मध्येच केंद्र शासनाकडे अण्णाभाऊना भारतरत्न देण्याबद्द्ल शिफारस केलेली आहे.म्हणून दिल्लीतच साक्षमोक्ष लावण्याचा प्रयत्न होता..


कारण दिल्लीत जर निर्णय झाला असता तर बरे वाटले असते आणी निर्णयाला वेळ लागणार असता तर 20/30 कार्यकर्त्यासह परत दिल्लीला जाउन धरणे उपोषण आंदोलनाचे नियोजन केले होते. परतू,नंतर करोनाचा कहर सुरु झाला. त्यामुळे थांबलो. गेल्या दोन महिन्यापासून मी मा. शरद पवार साहेब ना उध्ववजी ठाकरे देशाचे पंतप्रधान ना. नरेंद्र मोदी, नितीन गडकरी याना ई मेल मार्फत निवेदन देऊन विनंती केलेली आहे. मी निमित्त मात्र आहे. कारण मी सुरुवात जरी केली असली तरी त्यांनतर अनेक नेते अनेक सामाजिक संघटनांनी भारतरत्न देण्याची वेळोवेळी मागणी केली आहे.


मा.गिरीष बापट यांच्याशी सात आठ दिवसापूर्वी चर्चा झाली. ते म्हणाले पाहू हे वातावरण थोडे शिथिल झाले की आपण दोघे दिल्लीला जाऊन याबाबतचा निर्णय लावण्याचा प्रयत्न करु. पत्र शक्यता कमी वाटते करोना लॉक डाऊन यामुळे प्रयत्नाना खीळ आहे. खंत यांची आहे. 1 ऑगस्ट 2020 त्यांच्या जन्म शताब्दीची जयंती आहे. तोपर्यंत निर्णय व्हावा. ही अपेक्षा आहे. करोना नसता तर दिल्लीत बसूनच निर्णय करण्याचा सर्वोपतरी प्रयत्न करता आला असता पत्र खंत याची आहे.एवढे प्रयत्न करून करोनानी घात केला.याकामी पुणे शहरातील सर्व वर्तमान पत्रानी चांगली प्रसिध्दीदेण्याचे काम ही केले आहे.अजुन थोडे दिवस आहेत.प्रयत्न चालू आहेत.जिद्द सोडली नाही. या निवेदनाद्वारे केंद्र सरकारला पुन्हा एकदा विनंती करत आहे.