स्टार प्रवाहवर लवकरच सुरु होणाऱ्या ‘सुख म्हणजे काय असतं’ मालिकेचा पार पडला मुहूर्त

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 



 


पुणे :- स्टार प्रवाहवर लवकरच सुरु होणाऱ्या सुख म्हणजे काय असतं या मालिकेच्या प्रोमोजनी सध्या प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. लवकरच ही मालिका स्टार प्रवाहवर भेटीला येणार असून नुकताच या मालिकेचा मुहूर्त पार पडला. निर्माता दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या कोठारे व्हिजन्सने या मालिकेचीं निर्मिती केली असून या नव्या मालिकेसाठी स्टार प्रवाह आणि कोठारे व्हिजन्सची संपूर्ण टीम सज्ज झाली आहे. मुहूर्ताच्या या खास प्रसंगी कलाकारांसोबतच सेटवर महेश कोठारे, आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे उपस्थित होते. देवीचा आशिर्वाद घेऊन आणि सरकारी सुचनांचं पूर्णपणे पालन करत शूटिंगचा श्रीगणेशा करण्यात आला.


 


सुख म्हणजे काय असतं ही मालिका नावाप्रमाणेच प्रेक्षकांना मनोरंजनाचा सुखद अनुभव देईल यात शंका नाही. तेव्हा नवी गोष्ट घेऊन भेटीला येणाऱ्या या मालिकेची आणि या मालिकेतील नव्या पात्रांच्या भेटीची उत्सुकता आहे.