साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे .


 


रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A)या राष्ट्रीय पक्षाचा ३० वा वर्धापन दिनी मागणी .


 


 


 


रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A)या राष्ट्रीय पक्षाचा ३० वा वर्धापन दिन व याच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांचा वाढदिवस असून या प्रसंगाचे औचित्य साधून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कष्टकरी , गिरणी , कामगार , मजूर, वंचित , उपेक्षित वर्गासाठी आयुष्य भर संघर्ष करणारे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अग्रणी नेते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे .


 


 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) पुणे शहर जिल्ह्याच्यावतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार पुणे जिल्हा अध्यक्ष अमित वर्मा व पुणे शहर अध्यक्ष अशोका जगताप यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले .


 


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक ऐतिहासिक जनआंदोलनाने सुरुवात करण्यात आली . राज्यशासनाने तात्काळ अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा , संपूर्ण देशात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) च्या वतीने जनआंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा पुणे जिल्हाध्यक्ष अमित वर्मा यांनीदिला.


 


या कार्यक्रमाचे नियोजन अशोक जगताप , पक्षाचे महासचिव रवी क्षीरसागर ,उपाध्यक्ष आदिनाथ गायकवाड , सचिव शंकर पेटकर , युवा अध्यक्ष अविराज चव्हाण , किशोर कांबळे , महिला आघाडीच्या अध्यक्षा बेबीताई काटकर , दिपकभाऊ निकाळजे सामाजिक विकास संघटनेचे पुणे जिल्हाअध्यक्ष संदीप गायकवाड , सचिव प्रकाश नडगेरी, संघटक प्रमोद बनसोडे , आदित्य भोसले , उपाध्यक्ष ईश्वर ढोले , सचिन कोद्रे , उद्योजक मनोज शिंदे , अभिषेक भोसले , विक्की कांबळे व उमेश ननावरे आदी मान्यवर उपस्थित होते .