पुणे, दि. 6 : पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा झाला आहे. विभागात अंदाजे 19 हजार 801 क्विंटल अन्नधान्याची, 34 हजार 385 क्विंटल भाजीपाल्याची, 9 हजार 691 क्विंटल फळांची तर कांदा ,बटाट्याची 41 हजार 506 क्विंटल इतकी आवक झाली आहे.
पुणे विभागात 5 जुलै 2020 रोजी 93.95 लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून 25.82 लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. तर उर्वरित दूध सुट्टया स्वरुपात वितरित करण्यात आले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
( टिप : - सदरची आकडेवारी दुपारी 12.30 वा. पर्यंतची आहे )
0 0 0 0