मालेगाव पॅटर्न युनानी काढा शहाबुद्दीन काझी व मित्र परिवाराकडून नागरिकांसाठी*

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


 


*


 


 खडकी : मालेगाव पॅटर्न युनानी काढा शहाबुद्दीन काझी व मित्र परिवाराकडून नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला. कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यात मालेगावात यशस्वी ठरलेला अल हयात युनानी काढा लाभदायक व गुणकारी असल्याचे डॉ. मस्तान शेख यांनी सांगितले. कोरोना हा संसर्गजन्य विषाणू असला तरीही यात घाबरून जाण्यासारखे काहीच नाही. माझ्या २२ वर्षांच्या वैद्यकीय अनुभवातून विविध गुणकारी घटक वापरून हा काढा बनविला असून, याच्या वापराने मालेगावात कोरोनाचा वाढणारा प्रादुर्भाव रोखण्यात प्रभावशाली मदत झाली आहे, याचे कुठलेच दुष्परिणाम नसून याचा आरोग्यास फायदा होतो, असे शेख म्हणाले. कार्यक्रमात याप्रसंगी रिपाईंचे परशुराम वाडेकर, डॉ. निसार खान, मस्तान शेख, सामाजिक कार्यकर्ते शहाबुद्दीन काझी, विजय सोनिगरा आदी उपस्थित होते.