दलित पॅंथर" या आंबेडकरी संघटनेचा ४८ वा वर्धापन दिन.... दलित पॅंथर" या आंबेडकरी संघटनेचा ४८ वा वर्धापन दिन

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 



 


"कोरोना कोवीड" च्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने साजरा


 


पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा जवळ "दलित पॅंथर" या आंबेडकरी संघटनेचा ४८ वा वर्धापन दिन "कोरोना कोवीड" च्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.


 


प्रथमतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास भला मोठा पुष्पहार अर्पण करून संघटनेचे संस्थापकांपैकी एक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर चळवळीचे प्रणेते तथा विद्रोही साहित्यीक, कवी, लेखक आणि आंबेडकरी चळवळीतील लढवय्या नेता, पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या तैलचित्रास अभिवादन करून संघटने बद्दल माहिती व मार्गदर्शन या कार्यक्रमाचे उद्घाटक तथा आंबेडकरी चळवळीतील युवा नेते निलेश आल्हाट यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन दलित पॅंथर महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष यशवंतभाऊ नडगम यांनी केले होते तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोविंद साठे यांनी केले.


 


सदरील कार्यक्रमास प्रमोद कदम, सोनाली दोनगहू, विशाल शेजवळ, मुद्दसर शेख, विशाल ओव्हाळ, किरण जाधव, लहू वाघमारे , मायकल जॅक्सन सह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते