*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*
प्रसिद्ध विनोदी जेष्ठ अभिनेते जगदीप उर्फ सुरमा भोपाली वयाच्या ८१ व्या वर्षी अनंतात विलीन
*मुंबई:* प्रसिद्ध अभिनेते तसेच विनोदी कलाकार सईद इश्तयाक अहेमद जाफरी उर्फ जगदीप उर्फ सुरमा भोपाली यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी निधन. जगदिप हे हिंदी सिनेसृष्टीतल्या नावाजले प्रसिद्ध अभिनेते तसेच विनोदी कलाकार होते. गेल्या काही काळापासून त्यांना अनेक व्याधींनी ग्रासले होते. त्यातच त्यांची आज प्राणज्योत मालवली. उद्या त्यांचा दफनविधी होणार आहे. जगदीप यांच्या निधनाने हिंदी सिनेसृष्टी एका निखळ मनोरंजन देणाऱ्या दमदार अभिनेत्याला मुकली आहे.विनोदी भूमिकांसाठी विशेष ओळख निर्माण करणारे जगदीप यांनी बाल कलाकार म्हणून वयाच्या दहाव्या वर्षी रूपेरी पदद्यावर पदार्पण केले. गेली ७० वर्षे त्यांनी आपल्या दर्जेदार व सकस अभिनयाने रसिकाना हास्यरसात डुंबुन टाकले. दिवंगत जगदीप यांनी 'शोले' चित्रपटात 'सूरमा भोपाली'ची साकारलेल्या भूमिकेमुळे जगदीप यांना एक नवीन ओळख निर्माण झाली होती . या भूमिकेमुळे त्यांना फार मोठं ग्लॅमर मिळालं होतं.'शोले' चित्रपटातले सतत पान खात अखंड बड़बड़ करणारा लाकडी अड्डा मालक अर्थात सूरमा भोपाली हे पात्र अजरामर करून टाकले. सुरक्षा व वारदात या इंडियन बॉण्डपटात मुख्य नायक मिथून गनमास्टर यांच्या सहाय्यक कबाड़ी नामक पात्र मजेदार रंगवले आहे. विधाता, कुर्बानी, कालिया, शहेनशाह, हम पंछी एक डाल के, जॉनी दुश्मन, गज़ब, खिलौना, अंदाज अपना अपना, बिदाई, चायना गेट, युवराज, फिफ्टी फिफ्टी तसेच पुराना मंदिर, सामरीसह असंख्य भयपटात विनोदी भूमिकानी बहार आणली. जगदीप यांच्या पश्चात मुलगा जावेद, निर्माता व दिग्दर्शक नावेद, मुलगी मुस्कान जाफरी व दुसरी पत्नी नाझिमा असा परिवार आहे. जगदीप यांनी प्रदीर्घ काळ सिनेसृष्टीची सेवा केली. तब्बल ४०० चित्रपटांमधून त्यांनी भूमिका साकारली. त्यांच्या निधनाने एका दिग्गज विनोदी कलावंताला बॉलीवूड मुकल्याची भावना विविध कलावंतांनी व्यक्त केली आहे.
सा. पुणे प्रवाह परिवाराच्या वतीने या महान विनोदी कलाकाराला
भावपूर्ण श्रद्धांजली 💐🌹🙏🙏🙏