पुणे प्रवाह न्युज पोर्टल
(लेखक: प्रथमेश माल्या, गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष, एंजल ब्रोकिंग लिमिटेड)
कच्च्या तेलाच्या किंमती २०२० च्या मागील सहामाहीत अस्थिर झाल्या आहेत. हे दर $ ७१.७५/ बीबीएलच्या वर (८ जानेवारी २०२०) पोहोचले तर शून्यापेक्षाही खाली घ सरले (२० एप्रिल,२०२०) आणि निगेटिव्ह मूल्यावरही स्थिरावले होते. एनवायएम ईएक्स फ्यूचर्स एप्रिल एक्सपायरी कॉन्ट्रॅक्टमध्ये १३,०४४ चे ओपन इंटरेस्ट कॉन्ट्रॅक्ट झाले.
एप्रिल-२०२० मध्ये बाजारात सर्वात मोठा साठा आला. यामुळे अतिरिक्त तेलाची साठवणूक करण्यावरून गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली होती. कच्च्या तेलाचे मोठे ७.२ अब्ज बॅरल आणि कच्च्या तेलाची उत्पादने किना-यावर आणि तरंगत्या जहाजांमध्ये साठवण्यात आली होती. याचा अर्थ असा की, मार्च २०२० मध्ये केवळ १.७ अब्ज बॅरल किना-यावर साठवण्यात आले होते. सध्या तरी तेलाच्या दरांनी नकारात्मक क्षेत्रातून बाहेर येत आपले आकर्षण वाढवून सध्याचे $४३/बीबीएलचे बाजार मूल्य (९ जुलै २०२०) मिळवले आहे.
ओपेक आणि अलायन्सने तेलबाजारात पुन्हा संतुलन मिळवले:
१२ एप्रिल २०२० रोजी, ओपेक+ अलायन्स जून २०२० पर्यंत १० दशलक्ष बॅरल कपातीवर सहमत झाले. त्यानंतर वर्षाच्या अखेरीस दररोज ७.६ दशलक्ष आणि पुन्हा २०२१ म्हणजेच एप्रिल २०२२ पर्यंत ५.६ दशलक्ष बॅरलपर्यंत पहोचले.
दुसरे मोठे आव्हान म्हणजे ओपेक कार्टेलमधील दुसरा सर्वाधिक उत्पादक देश इराक. कोव्हिड-१९ मुळे या देशाचे खूप नुकसान झाले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी इराकला अतिरिक्त प्रयत्न करावे लागत आहेत. सौदी अरबकडून फंडिंग आणि आयएमएफकडून संभाव्य कर्जामुळे इराक ओपेक+ उत्पादन कपातीचे पालन करण्यास समर्थ ठरेल.
इराक उत्पादन कपातीत अपयशी ठरला तर संपूर्ण ओपेक+ करार कोलमडू शकतो. इराक हा ओपेकचा दुसरा सर्वात मोठा तेल उत्पादक देश आहे. देशाचे बजेट ९० टक्क्यांपेक्षा जास्त, जे २०१९ मध्ये ११२ अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत पोहोचले होते, ते तेलातील महसूलातून मिळाले होते.
जागतिक तेलाच्या मागणीला पुन्हा गती मिळाली:
रॉयटर्सनुसार, मागणी जर अशीच कमी होत राहिली तर ओपेकच्या अनेक स्रोतांनी दररोज २ दशलक्ष बॅरल उत्पादन वाढण्याच्या शक्यतेला पाठबळ दिले आहे. सौदी अरब आणि रशियाने पूर्वीच संकेत दिले आहेत की, ते तेलाची मागणी आणि किंमतीतील सध्याच्या स्थितीवर समाधानी आहेत.
साथ आणि लॉकडाऊनपूर्वी जागतिक तेलाची मागणी १०० एमबीपीडी होती. आता ती दररोज ९० दशलक्ष बॅरलपर्यंत पोहोचली आहे. आयएचएस मार्केटच्या अंदाजानुसार, एप्रिलच्या अखेरीस १८० दशलक्ष बॅरल तेल समुद्रात साठवण्यात आले होते. जूनच्या अखेरीस ते फक्त १५० दशलक्ष बॅरल पर्यंत कमी झाले.
कच्चे तेल लवकरच ५० डॉलर प्रति बॅरलच्या दरावर पोहोचेल का?
वित्तीय बाजाराच्या इतिहासात २०२० हे वर्ष ऐतिहासिक म्हणून नोंदवले जाईल. ब्रेक्झिट, निगेटिव्ह बाँड यील्ड्स, ग्लोबल ट्रेड वॉर, ऑइल प्राइस क्रॅश आणि सध्याच्या कोरोना विषाणूच्या साथीमुळे जगात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
हा आशावाद कायम ठेवण्यासाठी चीनचा अधिकृत पीएमआय जूनमध्ये तीन महिन्याच्या उच्चांकी स्तरावर ५०.९ पर्यंत पोहोचला. तर प्रायव्हेट कॅक्सिन/ मार्केट पीएमआय सहा महिन्यांतील उच्चांकी स्तरावर ५१.२ वर पोहोचला आहे. मंदी आणि विकासाला वेगळ्या करणा-या रेषेच्या वर म्हणजे ५० च्या पुढे हे दोन्ही आकडे आहेत. पीएमआय नंबर हा बेस मेटल्समध्ये सकारात्मक गतीचे संकेत देतो.
संयुक्त राज्य अमेरिकेतील इन्स्टिट्यूट ऑफ सप्लाय मॅनेजमेंटच्या पीएमआयमध्ये जून महिन्यात पुन्हा विकास दिसून आला, जो ५२.६ पर्यंत पोहोचला होता. युरोझोन पीएमआय विकासाच्या जवळ पोहोचला आहे, तो मेमधील ३९.४ वरून वाढत जूनमध्ये ४७.४ पर्यंत वाढला.
अमेरिका आणि चीनने चालू महिन्यांमध्ये उत्पादनाची सकारात्मक आकडेवारी दर्शवली असली तरीही जगभरात साथीचा कहर सुरूच आहे. विशेषत्वाने संयुक्त राज्य अमेरिका आणि काही दक्षिण अमेरिकी देशांमध्ये, अजूनही याकडे अजूनही फार महत्त्व दिले जात नाही.
ग्लोबल ऑइल इन्व्हेंट्रीमध्ये कायम घसरण, जागतिक अर्थव्यवस्था सुधारण्याची सुरुवात, ओपेक+ अलायन्सद्वारे संभाव्य उत्पादन वाढीदरम्यान जागतिक मागणीत सुधारणा तसेच अमेरिका आणि यूरोपात (गॅसोलीन आणि डिस्टिलेट्स) उत्पादनांसाठी कच्च्या तेलावर प्रक्रिया करणा-या रिफायनरींचा वाढता खर्च, हे सर्व जागतिक तेलाची मागणी स्थिर करण्यासाठी सुधारणेची सुरुवात असल्याचे संकेत आहेत.
एकूणच, जागतिक महाशक्तींकडून संभाव्य सुधारणांचे संकेत मिळतात. पीएमआयच्या आकडेवारीतूनही हे स्पष्ट होते. कच्च्या तेलाचे वाढते दर हे जागतिक सुधारणेला गती मिळण्याच्या प्रक्रियेतील एक महत्त्वाचे घटकबिंदू आहेत.
विषाणूच्या दुसऱ्या लाटेने जगावर पुन्हा एकदा निशाणा साधल्यास निरंतर आणि शाश्वत सुधारणेचा आशावाद कोलमडून पडू शकतो. कच्च्या तेलाचे दर सध्या (सीएमपी:$ ४३/बीबीएल) आहेत, एका महिन्यात ते $ ५०/ बीबीएलच्या पुढे जातील. याच काळात एमसीएक्स ऑइल फ्यूचर्स साधारणत: ३,५०० रुपये/बीबीएलपेक्षा जास्त वाढू शकतो.