पुणे प्रवाह न्युज पोर्टल
~ व्यावसायिक जीवनात कौशल्य वृद्धींगत करण्यावर दिला गेला भर ~
मुंबई, २९ जुलै २०२०: भारतातील प्रिमियर ऑनलाइन जॉब रेडिनेस आणि प्लेसमेंट प्लॅटफॉर्म असलेल्या सेफजॉबने ‘द ग्रेट इंडियन डिस्कशन अर्थात ग्रिड’ ही भारतातील पहिली व्हर्चुअल ग्रुप डिस्कशन स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेत देशभरातील ७० शहरांमधील ३,५०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यात दिल्ली युनिव्हर्सिटी, गॅलगोटिअस युनिव्हर्सिटी, लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, आयटीएम युनिव्हर्सिटी इत्यादीसारख्या शीर्षस्थ संस्थांसह ५०० कॉलेजचा समावेश होता.
डीएव्ही कॉलेजची प्रियंका पाठक या बौद्धिक स्पर्धेची लाइव्ह डिस्कशनची विजेती ठरली. तर प्रथम आणि द्वितीय उपविजेत्यांत अनुक्रमे लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीची उर्वी काथुरिया आणि आयएएमआर कॉलेजचा शिवम गोयल यांचा क्रमांक लागला. विजेत्यांना ३०,००० रुपये, २०,००० रुपये आणि १०,००० रुपयांचे रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तथापि या यशातील सर्वात मोठी प्राप्ती म्हणजे, संपूर्ण स्पर्धेतील त्यांचा शिकण्याचा अनुभव. सेफजॉब टीमचे मार्गदर्शन आणि मदतीने मुलाखती आणि इंटर्नशिप मिळण्याची संधी ही आहे.
अशा प्रकारच्या स्पर्धांद्वारे सेफजॉबला देशातील प्रत्येक काना-कोप-यातील तरुण भारतीयांना कौशल्य विकसित करण्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याची इच्छा आहे. विशेषत: सध्याच्या संकटाच्या काळात तरुणांना व्यावसायिक करिअर तसेच कॉर्पोरेट नोक-यांसाठी सज्ज होण्यास मदत करण्याचा उद्देश यामागे होता.
सहभागींची क्षमता तपासण्यासाठी, त्यांच्याकडून नव्या कल्पना घेण्यासाठी, दैनंदिन घडामोडींशी संबंधित विषयांवर सामूहिक चर्चा करण्याचा एक जागरूक प्रयत्न करण्यात आला. यापैकी काही चर्चेत आत्मनिर्भर भारत योजाना, नैराश्याची कारणे व ते कसे टाळता येईल? फेसबुक आणि जिओ डील- चांगली की वाईट?, कोरोनानंतरचा भारत: बचावात्मकतेकडून भरभराटीकडे, भारतीय राजकारणात सोशल मीडियाची भूमिका, उच्च शिक्षण की कौशल्य संपादन- भारताच्या वृद्धीसाठी उत्कृष्ट चालक कोण? इत्यादी विषयांचा समावेश होता.