कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी वापरलेले पीपीई किट उघड्यावर

पुणे प्रवाह न्युज पोर्टल.. 



नेरळ-कर्जत रस्त्यावरील घटना


कर्जत,ता.27 गणेश पवार


                    महाभयंकर कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पीपीई किट वापरले जाते.ते पीपीई किट जैविक कचरा म्हणून नष्ट केले जाण्याचे आदेश आहेत.दरम्यान,  संकट एकीकडे असताना दवाखान्यात वापरण्यात आलेले पीपीइ किट चुकीच्या पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी टाकला जात आहे. दरम्यान,कर्जत-नेरळ राज्यमार्ग रस्त्यावर पीपीई किट आढळून आले असून संबंधित व्यक्तींची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी पुढे आली आहे. 


                     कोरोनाने जगभर थैमान घातले असून कर्जत तालुक्यात कोरोनाच्या रुग्णाची संख्या ही दिवसागणिक वाढत आहे.त्यामुळे कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या जात आहेत, असे असताना कर्जत -कल्याण मार्गाला लागून असणाऱ्या वृद्धश्रमा जवळील रस्त्यावर कोरोना रुग्णांवर उपचार करत असताना वापरत येत असलेले संपूर्ण पीपीई किट, मास्क हे रस्त्याच्या बाजूला टाकल्याचे आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जाहीर केलेल्या लॉक डाऊन मुळे दिवसभर घरात राहिलेले लोक मोठ्या प्रमाणात नागरिक मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडतात. कर्जत-नेरळ रस्त्यावर सकाळ आणि संध्याकाळ मोठ्या प्रमाणात लोक चालण्यासाठी या भागात जात असतात.दिवसाच्या सुरुवातीला सकाळी शुद्ध हवा घेण्यासाठी नेरळ गावातून कर्जत रस्त्यावर जाणाऱ्या तरुणांना आज 26 जुलै रोजी पीपीई किट आढळून आले.कर्जत रस्त्याला लागूनच असलेल्या डीग्निटी लाइफस्टाइल वृध्दाश्रमाच्या बाजूला रस्त्याच्या कडेला पीपीई किट आढळून आले. काही दिवसांपूर्वी याच   वृद्धाश्रम मध्ये तब्बल 15 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते,तर एकाचा मृत्यू देखील झाला आहे.यामुळे चिंतेचे वातावरण असताना अशा प्रकारे रस्त्याच्या कडेला उघड्यावर वापरलेले पीपीई किट आढळून आल्याने नागरिकांनी मोठी चिंता व्यक्त केली आहे.


                 प्रामुख्याने डॉक्टर, परिचारिका आणि स्वचछता कर्मचारी,वाहनचालक यांना कोविड रुग्णाच्या परिसरात जाण्यासाठी पीपीइ वापरत असतात.जेमतेम चार तास वापरल्यानंतर हा जैविक कचरा  विशिष्ठ पद्धतीने नष्ट करावा लागतो.परंतु आज सकाळी या भागात हा जैविक कचरा सार्वजनिक ठिकाणी आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.नक्की हा जैविक कचरा कोणी टाकला हे जरी माहीत नसले तरी अशा पद्धतीत हा कचरा कुठेही सार्वजनिक ठिकाणी सापडून आला असल्याने नागरिकांच्या आरोग्याबाबत आणि  सुरक्षिततेच्या बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। एकूणच प्रशासनाच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित निर्माण होत आहे.आता या  बाबत स्थानिक रहिवाश्यांकडून बेजबाबदार वागणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी पुढे येत आहे.


फोटो ओळ 


रस्त्याच्या कडेला पडलेले पीपीइ किट


छायाः गणेश पवार