पुणे प्रवाह न्युज पोर्टल
*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*
*महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण बाधा झाली असून त्यांना उपचारासाठी नानावटी रुग्णालयात भरती*
*मुंबई:* महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण बाधा झाली असून त्यांना उपचारासाठी नानावटी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. अमिताभ पाठोपाठ अभिषेक बच्चन यांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे.
अमिताभ बच्चन यांनी स्वतः ट्विट करून याबद्दल माहिती दिली आहे. अमिताभ यांची काल (11 जुलै) कोरोना चाचणी केली होती.ज्याचा अहवाल आज आला आहे.
अमिताभ यांचे ट्वीट माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.त्यामुळे मला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. कोरोना चाचणी करण्यात आल्या असून त्यांचा अहवाल येणे बाकी आहे. मागील 10 दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोना चाचणी करावी, अशी विनंती ही अभिताब बच्चन यांनी केली आहे.