टेन्शनवरची मात्रा होणार आता डबल! - महाराष्ट्राची हास्यजत्रा १३ जुलैपासून, सोम. ते गुरु. रात्री ९ वा

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


.


महाराष्ट्राची हास्यजत्रा या सोनी मराठी वाहिनीवरील सर्वांच्या लाडक्या कार्यक्रमाचं चित्रीकरण सुरु झालं असून सगळे कलाकार तीन महिन्याने चित्रीकरण करताना खूप आनंदात आहेत. शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचं पालन करून कार्यक्रमाचं चित्रीकरण केलं जात आहेत. 


 


महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम सर्वांचा आवडता कार्यक्रम आहे आणि टेन्शनवरच्या या मात्रेचा डोस डबल होणार आहे कारण १३ जुलैपासून महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम आठवड्यातून ४ दिवस म्हणजेच सोमवार ते गुरुवार लोकांना पाहायला मिळणार आहे. 


 


मधल्या काळात कलाकारांनी देखील आपल्या सहकलाकारांना खूप मीस केलं आणि आता इतक्या महिन्याने भेटल्यावर सोशल डीस्टानसिंगचे सर्व नियम पळून ते सेट वर मजा देखील करत आहेत. 


 


पाहात राहा महाराष्ट्राची हास्यजत्रा सोमवार ते गुरुवार रात्री ९ वाजता फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.