वित्तीय क्षेत्रात मजबूत सुधारणेचा शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 



 


मुंबई, १७ ऑगस्ट २०२०: वित्तीय क्षेत्रात मजबूत सुधारणा झाल्याने भारतीय बाजार आज सकारात्मक स्थितीत बंद झाला. निफ्टीने ०.६१% किंवा ६८.७० अंकांची वाढ घेतली व तो ११,२४७.१० अंकांवर स्थिरावला. तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्स ०.४६% किंवा १७३.४४ अंकांनी वाढला व तो ३८,०५०.७८ अंकांवर स्थिरावला.


 


एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की आजच्या व्यापारी सत्रात एनटीपीसी (७.४७%), आयशर मोटर्स (४.७९%), झी एंटरटेनमेंट (४.७१%), हिंडाल्को (४.४६%) आणि बजाज ऑट (४.३३%) हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. तर दुसरीकडे एसबीआय (१.५५%), भारती एअरटेल (१.४७%), बीपीसीएल (१.२८%), रिलायन्स इंडस्ट्रीज (०.९३%) आणि टाटा मोटर्स (०.७२%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले. फार्मा क्षेत्र वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक आज हिरव्या रंगात स्थिरावले. बीएसई मिडकॅप ०.४१% नी वाढला तर बीएसई स्मॉलकॅप ०.८४% नी वधारला.


 


ब्रिटानिया इंडस्ट्रीज लिमिटेड: कंपनीच्या शेअर्समध्ये २.०७% ची वृद्धी झाली आणि त्यांनी ३,८७९.९५ रुपयांवर व्यापार केला. तत्पूर्वी कंपनीने प्रति शेअर ८३ रुपयांच्या अंतरिम लाभांशाची घोषणा केली.


 


सन टीव्ही नेटवर्क लिमिटेड: कंपनीच्या स्टॉकमध्ये ०.०६% ची वृद्धी झाली व ग्लोबल रिसर्च फर्म सीएलएसएने स्टॉकवर खरेदी कायम ठेवल्यानंतर त्यांनी ४२४.४० रुपयांवर व्यापार केला. कंपनीच्या पहिल्या तिमाहीत उत्पन्न सकारात्मक झाले. त्यानंतर सबक्रिप्शन रिव्हेन्यूमध्ये १८% ची वाढ दिसून आली.


 


एनटीपीसी लिमिटेड: कंपनीच्या शेअरच्या किंमतीत ७.४७% ची वृद्धी झाली आणि कंपनीची जूनमधील कमाई शेअर मार्केटच्या अंदाजापेक्षा जास्त झाली. परिणामी शेअर्सनी ९५.०० रुपयांवर व्यापार केला. कंपनीच्या नफ्यात ६% ची घट झाली तर ऑपरेशन्समधील महसुलात २.५७% ची घसरण झाली.


 


ग्लेनमार्क फार्मास्युटिकल लिमिटेड: कंपनीने नफ्यात दुप्पट वृद्धीची घोषणा केली. त्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये १.४८% ची वाढ झाली व त्या ४८२.७५ रुपयांवर व्यापार केला. २०२१ या वित्त वर्षातील पहिल्या तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा २५४.०४ कोटी रुपये झाला. तर कंपनीचा एकत्रित महसूल २,३४४.७८ कोटी रुपये झाला.


 


रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड: आरआयएलच्या शेअर्समध्ये ०.९३% ची घसरण नोंदवली गेली व त्यांनी २,०९४.०५ रुपयांवर व्यापार केला. दरम्यान सुप्रीम कोर्टाने एजीआरच्या वसूलीसाठी (तत्काळ अॅग्रीमेंट) च्या मागणीसंबंधी याचिका रद्द केली.


 


भारतीय रुपया: सकारात्मक देशांतर्गत इक्विटी बाजारात अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया आजच्या व्यापारी सत्रात फ्लॅट स्थितीत ७४.८८ रुपयांवर बंद झाला.


 


सोने: मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) वर आजच्या सत्रात पिवळ्या धातूचा व्यापार सकारात्मक स्थितीत बंद झाला. ऑक्टोबर डिलिव्हरीसाठी गोल्ड फ्यूचर्स १० ग्राम सोन्यासाठी ०.१२% च्या वृद्धीसह ५२,२९० रुपयांवर बंद झाला.


 


जागतिक बाजार: युरोपीय आणि आशियाई बाजारात कोव्हिड-१९ चे रुग्ण आणि भू-राजकीय मुद्द्यांच्या वाढत्या प्रमाणामुळे संमिश्र ट्रेंड दिसून आला. नॅसडॅकमध्ये ०.२१%, एफटीएसई एमआयबीमध्ये ०.३०%ची घसरण दिसून आली. तर निक्केई २२५ मध्ये ०.८३% ची घट दिसून आली. दुसरीकडे एफटीएसई १०० च्या शेअर्समध्ये ०.५७% आणि हँगसेंगमध्ये ०.६५% ची वृद्धी झाली.