दिग्विजय तरुण मंडळाच्या वतीने पोलिस व नागरिकांना 3000 मास्क व सॅनिटायझर वाटप.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल



पुणे (दि.१९) :-  करोना महामारीच्या पाश्र्वभूमीवर दिग्विजय तरुण मंडळाच्यावतीने खडक पोलिस


स्टेशन येथील पोलिस बांधवांना १५०० मास्क, संनिटायझर तसेच नागरिकांना १५०० मास्क


व संनिटायझर वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष राहुल उर्फ मनोज मुकुद जगताप यांनी केले. या प्रसंगी परिमंडल १ चे पोलिस उपआयुक्त स्वप्ना गोरे, वरिष्ठ पोलिस


निरीक्षक खडक पोलिस स्टेशन भरत जाधव, गुन्हे निरीक्षक खड़क पोलिस स्टेशन उत्तम चक्र, तसेच कर्मचारी वृंद सोमनाथ ढगे, सुमित यादव, अनिकेत बांदल, सामाजिक कार्यकर्ते राहुल उर्फ मनोज मुकुंद जगलाप तसेच दिग्विजय तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.