*शेतकऱ्यांना लुटणारे अलिबाबा सरकारचेच टोळीत,* *गाई, म्हशीच्या कासेला लागलेले गोचिड, ऊसातुन आलेले...* *शेतकर्यांना जगण्याचा अधीकार नाही का.? शरदजोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे पाईक प्रदेशाध्यक्ष श्री. विठ्ठल पवार राजे यांचा सनसनाटी आरोप*.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


*शेतकऱ्यांना लुटणारे अलिबाबा सरकारचेच टोळीत,


*गाई, म्हशीच्या कासेला लागलेले गोचिड, ऊसातुन आलेले...*


*शेतकर्यांना जगण्याचा अधीकार नाही का.? शरदजोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे पाईक प्रदेशाध्यक्ष श्री. विठ्ठल पवार राजे यांचा सनसनाटी आरोप*.


( *शेतकऱ्यांच्या लुटीला शासन प्रशासनातील कलम कसाईच जबाबदार,*.....


*.. आज पासुन शरदजोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे अनोखे आंदोलन, पुणे श्रमीक पत्रकारांना, पत्रकार परीषदेत प्रेस नोट सोबत मोफत दुध वाटप करत," हम किसान है, जहर नही, दुध पिलाते हैl जागो सरकार जागो, दुधाला हमी भाव मिलालाच पाहीजे, अश्या घोषना देत, शेतकऱ्यांनी पत्रकार परीषद दणाणून सोडली... सौ. मालती प्रकाश पाटील प्रदेशसहसचिव.*)


 


पुणे. दिनांक२४. दिपक फाळके (शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य. पश्चिम महाराष्ट्र सोशल मीडिया प्रमुख ) पुणे :- सहा आठवड्यात दुध ऊत्पादक शेतकरी याचीकाकर्ते विठ्ठल पवार राजे यांचे समवेत चर्चा करुन दुध दर हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी होत असलेले दरांवर ठोस चर्चा करुन मा न्यायालयाला संपुर्ण अहवाल सादर करा, असा न्यायीक आदेश मुंबई मा.उच्च न्यायालयाने विठ्ठल पवार राजे प्रदेशाध्यक्ष शरदजोशी विचारमंच शेतकरी संघटनेने दाखल केलेल्या जनहीत याचीकेवर दि २२ रोजी दिला. 


संघटनेचे लिगल ऍडव्हायजर प्रसिद्दी विधीज्ञ, उच्च न्यायालयाचे वकील मा अजयजी तल्हार आसिस्टंट साँलीसिटर जनरल, मा शिल्पाताई तल्हार हाय कोर्ट वकील (माजी सरकारी वकील) यांचे नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे दुध दरा बाबत दि १० जुलै २०२० रोजी दाखल केलेले याचीकेवर मुंबई उच्च न्यायालयाने दि २२ अगस्त रोजी निर्णय दिलेला आहे. 


याबाबत आज पुणे येथे संघटनेने, "पत्रकार परिषदेचे" आयोजन केले त्यावेळी ते बोलत होते.


[ शेतकऱ्यांचे लुटीला शासन प्रशासनातील कलम कसाईच जबाबदार,.....


.. आज पासुन शरदजोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे अनोखे आंदोलन, पुणे श्रमीक पत्रकारांना, पत्रकार परीषदेत प्रेस नोट सोबत मोफत दुध वाटप करत, "हम किसान है, जहर नही, दुध पिलाते हैl जागो सरकार जागो, दुधाला हमी भाव मिळालाच पाहीजे, अश्या घोषना देत, शेतकऱ्यांनी पत्रकार परीषद दणाणून सोडली...]


 


 आज पुणे येथे मा. विठ्ठल पवार राजे प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य व संघटनेचे पदाधिकारी आणि मीडियाचे समन्वयक, रिपोर्टर आणि जेष्ठ, कनिष्ठ शेतकरी बंधू आणि भगिनी यांच्यासमवेत पुणे जिल्हा श्रमिक पत्रकार भवन गांजवे चौक पुणे या ठिकाणी संपन्न झाली यावेली संघटनेचे प्रकाश पोरवाल, हिरामण बांदल, अर्जुन कोर्हाले उपाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र, दिपक फाळके. पश्चिम महाराष्ट्र सोशल मीडिया प्रमुख, डॉ प्रकाश पाटील, राजु चौधरी, मंगेश शिगवण, अनिल भांडवलकर, अरशफ खान, अमोल बाथम, के.डी. तात्या पवार, श्री प्रकाश चव्हाण, विक्रम जानगुडे, जयश्री अरुण चव्हाण, विलास निकाळजे आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


     त्यावेळी बोलताना श्री.विठ्ठल पवार राजे यांनी शेतकरी आणि कष्टकरी बांधवांवर होणाऱ्या अन्यायाचा संपूर्ण पाढाच प्रसारमाध्यमांच्या (मीडिया) समोर वाचून दाखविला. 


गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून माझ्या शेतकरी राजाच्या दुधाला, "हमीभाव " मिळावा यासाठी आपली, "शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य " सातत्याने प्रयत्नशील होती आणि त्याचे 'फळ', आपणाला आज मिळाले आहे हे सुद्धा कशा पद्धतीने मिळविले गेले हे सुद्धा मीडियाच्या समोर संपूर्ण कागदोपत्री आणि स-संदर्भ स्पष्टरित्या आपले म्हणणे त्यांनी मांडले आणि सरकार आणि बाकीच्या संधीसाधू लोकांच्या आणि इतर संघटना यामुळे माझा बळीराजा कसा आर्थिक विवंचनेत आहे याचा लेखाजोखा सर्व शेतकरी, कष्टकरी आणि प्रसारमाध्यमांचे प्रमुख यांच्या पुढे मांडला.


        आतापर्यंत फक्त प्रशासन दरबारीं निवेदन देणे, चर्चा करणे हेच चालू होते पण माझ्या शेतकरी राजाला न्याय काय मिळत नव्हता... !!! सरकारच्या इच्छाशक्ती च्या बाबतीत असणारी काम न करण्याची वृत्ती यामुळे आम्हाला कायद्याच्या न्याय व्यवस्थेकडे का जावेसे वाटले आणि त्यामध्ये आम्ही सबळ पुराव्यानिशी मुंबई उच्च न्यायालयात जे पिटिशन दाखल करून आमची बाजू योग्यच कशी आहे हे सिद्ध केले. हा आमच्या शरद जोशी विचारमंच संघटनेचा विजय आहेच पण महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण भारत देशातील शेतकरी आणि कष्टकरी बांधवाचा हा विजय आहे असे मत त्यांनी मांडले.  


 शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे नामांकित विधीज्ञ मा. अजयजी तल्हार असिस्टंट सॉलिसिटर जनरल व मा. शिल्पाताई तल्हार मुंबई हाईकोर्ट वकील यांच्या नेतृत्वाखाली उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करून आज त्या कामी आपण यशस्वी झालो आहोत हे सुद्धा अध्यक्ष महोदयांनी सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींच्या समोर सांगितले.  


              मुंबई उच्च न्यायालयाने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने शरद जोशी विचारमंच संघटना महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष श्री. विठ्ठल पवार राजे यांनी मांडलेले म्हणणे शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी महाराष्ट्र राज्य सरकार ला आज आदेशित केले आहेत आणि आजचा हा विजय फक्त महाराष्ट्र राज्यातील नव्हे तर संपूर्ण भारत देशातील सर्व शेतकरी आणि कष्टकरी बांधवांचा हा विजय आहे आणि भारत देश्याच्या इतिहासातील शेतकरी राज्याच्या बाबतीतील सर्वात मोठी घटना म्हणलं तरी ते अयोग्य होणार नाही...!!! 


असा त्यांनी उल्लेख केला.


 त्याच बरोबरीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची आणि महामानव आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या आर्टिकल 19 आणि 21 मध्ये, "भारतीय संविधानात शेतकऱ्यांना सुखाने व सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे " हीं वस्तुस्तिथी सुद्धा प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना समजावून सांगितली. आणि सरकारी बाबू, उपभोक्ते, आमदार आणि खासदार यांनी हे कदापी विसरू नये अशी तंबी श्री विठ्ठल पवार राजे प्रदेशाध्यक्ष शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी सरकारला दिली.


दुधाला 'हमीभाव' देणे हीं सरकारची नैतिक जबाबदारी असताना सुद्धा सरकार मधल्या काही मंत्र्यानी ती झटकण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे आम्हाला न्यायाच्या मार्गाने जावे लागले आणि विजय हा आपल्या शरद जोशी विचारमंच संघटनेचा, शेतकर्यांचा विजय झाला पण विजय फक्त संघटनेचा नसून हा संपूर्ण भारत देशातील कष्टकरी आणि शेतकऱ्यांचा विजय आहे हे सांगण्यास प्रदेशाध्यक्ष विसरले नाहीत आणि संघटना बळकटीकरणा वर अजून खूप मोठया प्रमाणावर भर देऊन भविष्यात शेतकरी राजा सुखी झाला पाहिजे असे मनोगत त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. त्यांच्या कार्याला माझा मनापासून सलाम.


आणि खूप खूप शुभेच्छा .


आपली नम्र,


सौं. मालतीताई प्रकाश पाटील.


प्रदेश सहसचिव तथा प्रदेश संपर्क प्रमुख. महाराष्ट्र राज्य. तथा अध्यक्षा जळगाव जिल्हा व खान्देश विभाग.


प्रकाशक ए एम खान प्रसिद्दी प्रमुख पुणे.