पुणे प्रवाह न्युज पोर्टल
पुणे, ११ ऑगस्ट २०२०: जागतिक टीव्ही उदयोगातील अग्रगण्य कंपनी टीसीएलने स्वातंत्र दिनाच्या निमित्ताने पुणे आणि परिसरातील स्टोअर्समध्ये विशेष ऑफर जाहीर केली आहे. ४५,९९० पासून प्रारंभ होणा-या टीसीएल ४ के क्यूएलईडी टीव्हीच्या खरेदीवर ग्राहकांना ३,९९९ रुपयांचे एअरबड्स मोफत देण्यात येणार आहेत.
४ के क्यूएलईडी टीव्ही हा हँड्स-फ्री एआयसह येत असून तो तीन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. ५० इंच (४५,९९० रुपये), ५५ इंच (५५,९९० रुपये) आणि ६५ इंच (७९,९९० रुपये). ४५,९९० रुपये किंमतीपासून सुरु होणा-या शक्तीशाली डिव्हाइसमध्ये ४ के रिझोल्यूशन क्वांटम डॉट डिस्प्ले, हँड्सफ्री व्हॉइस कंट्रोलसह डॉल्बी व्हिजन अँड डॉल्बी अॅटमॉस, खात्रीशीर व्हॉइस रिकग्निशन देण्यासाठी १८० डिग्री व्हॉइस रिसिप्टर आदी सुविधा उपलब्ध आहेत.
ग्राहकांना स्वस्त किंमतीत दर्जेदार उत्पादनांचा आनंद द्यावा याची सुनिश्चिती ब्रँड घेत आहे. टीसीएल हा तिरुपती येथील कारखान्यात स्थानिकांना प्राधान्य देत सरकारच्या उपक्रमास पाठींबा देत आहे. ब्रँडला चार वर्षे पूर्ण झाल्याने मार्केटकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.