*मा. विकास आण्णा पासलकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिष्यवृत्तीच्या माध्यमातून मदत निधीचे वाटप थेट गावपातळीवर जाऊन*

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


 


 


*मा. विकास आण्णा पासलकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिष्यवृत्तीच्या माध्यमातून मदत निधीचे वाटप थेट गावपातळीवर जाऊन*


 


 


 *ख्वाहिशों से नहीं गिरते हैं, फूल झोली में ।*


*कर्म की शाख को हिलाना होगा।*


*कुछ नहीं होगा, कोसने से अँधेरे को ।*


*अपने हिस्से का दिया खुद ही जलाना होगा ।*


 


बैकर वस्ती, प्रभाचिवाडी किल्ले विसापूरच्या दुर्गम भागात संह्याद्रीच्या कपारीत वसलेल्या जगाच्याशी काहीही देणं घेणं नसलेल्या या छोट्याशा वस्त्या आणि या वस्तीवरील कु.पलक बैकर ही महादेव कोळी या आदिवासी समाजातील विद्यार्थीनी. प्रभाचिवाडी ची कातकारी समाजातील कु.उषा घोगरे या दोघी नुकतीच दहावीची परीक्षा पास झाल्या. रोज आठ - दहा किलोमीटर दुर्गम अशा संह्याद्रीची डोंगरावाट तुडवत शाळेत जाणाऱ्या या विद्यार्थीनी. त्याचप्रमाणे कु. रितु बाळासाहेब सावंत, सावंतवाड़ी 10 वीत 88% मार्क्स, चि. गौरव खिलारी, महागाव इयत्ता आठवी आणि ओंकार गायकवाड़, महागाव, इयत्ता नववी, किरण सोनार इयत्ता नववी अशा सहा विद्यार्थ्यांना मा. विकास आण्णा पासलकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज शिष्यवृत्तीच्या माध्यमातून मदत निधी थेट गावात पोहोच केला.


यातील कातकरी समाजातील कु.उषा घोगरे या विद्यार्थिनीच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी मा.विकास आण्णा पासलकर यांनी घेत असल्याचे जाहीर केले...


प्रबोधन आणि कृती याची सांगड घालत सामाजिक उपक्रमांनी आपला वाढदिवस साजरा करण्याची समृद्ध परंपरा आम्ही राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून जोपासत आहोत... या आमच्या प्रयत्नांना समर्थ साथ देणारे आमचे राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशनचे मार्गदर्शक संभाजी ब्रिगेडचे केंद्रीय निरीक्षक, अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष मा.विकास आण्णा पासलकर यांनी त्यांचा वाढदिवस आज मंगळवार, दि.18 ऑगस्ट 2020 रोजी पवन मावळातील किल्ले लोहगड विसापूरच्या पायथ्याशी असलेल्या महागाव-सावंतवाडी भागातील विद्यार्थ्यांसोबत साजरा केला.


सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोट्यावधी बांधवांचे संसार उघड्यावर पडले आहेत. अशा या बांधवांच्या जीवनात शिक्षणाला शेवटचे प्राधान्य. अशा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे चेक व शालेय साहित्य वाटप करण्यात आले... दरवर्षी *विकासअण्णा पासलकर* त्यांचे वाढदिवस सामाजिक उपक्रम घेऊन साजरे करत असतात..


 


*वाढदिवस 2016*


अकरा मुलींना शैक्षणिक शिष्यवृत्ती ज्यामध्ये MPSC, UPSC, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या व इतर विद्यार्थिनी होत्या.


*वाढदिवस 2017;*


बीड व उस्मानाबाद या जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले व भोर वेल्हा या मावळातील व रायगडावरील दही, दूध, सरबत विक्री करणाऱ्या २५ लहान मुलांना शैक्षणिक शिष्यवृत्ती.


 


*वाढदिवस 2018;* 


मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या कुटुंबाला मदत.


 


*वाढदिवस 2019;*


पूरग्रस्त भागातील कुटूंबाना मदत वाटप, वैद्यकीय कॅम्प.


 


*वाढदिवस 2020;*


महागाव, सावंतवाडी, बैकर वस्ती अशा दुर्गम भागातील गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व शालेय साहित्य वाटप.


 


वीर बाजी पासलकर यांचा समृद्ध गौरवशाली वारसा सांगत शिव- फुले- शाहू-आंबेडकर यांचा कृतिशील वारसा जपण्याचा आदर्श घालून देणारे आमचे सहकारी, मार्गदर्शक विकासआण्णा पासलकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा...


*उपक्रम सहकार्य;*


*मा.राजाभाऊ पासलकर, दत्ताभाऊ पासलकर, मंदार बहिरट, लहू पडवळ, (महागाव), धोंडिबा घारे सर (महागाव)*


 


*#एक पाऊल कृतिशीलते कडे*


~~~~~~~~~~~~~~


*राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशन (रजिस्टर्ड)*


*अखिल भारतीय शिवमहोत्सव समिती*


संपर्क; कैलास वडघुले, प्रशांत धुमाळ, अनिल माने.