कोंदण चित्रपटाचे पुण्यात पोस्टर लॉन्च! ऑनलाईन प्रदर्शित होणारा 'कोंदण' हा पहिला मराठी चित्रपट

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



पुणे : कोरोनाच्या कठीण काळात संपूर्ण बॉलिवूड चित्रपटसृष्टी पुन्हा नव्या जोमाने उभी राहतेय. नवीन येणारे बरेच मोठे हिंदी चित्रपट ऑनलाईन रिलीज होत आहेत तर आपली मराठी चित्रपटसृष्टी देखील यामध्ये मागे कशी राहिल. सांगली जिल्हा ता. खानापूर गाव नागेवाडी येथील दिग्दर्शक सचिन अशोक यादव यांचा कोंदण हा पहिला मराठी चित्रपट आहे जो कोरोना काळात ऑनलाईन या https://www.cinemapreneur.com OTT वेबसाईट वर १ ऑगस्ट २०२० रोजी प्रदर्शित झालेला आहे. to INDO AMERICAN INTERNATIONAL FESTIVAL OF WORLD CINEMA 2020 आणि ASIAN INTERNATIONAL FILM FESTIVAL या दोन आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रपट महोत्सवात ऑफिशियल सिलेक्शन होण्याचा गौरव देखील या चित्रपटाने पटकावला आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादासोबत २ आठवडे पूर्ण झाले.


            आत्मनिर्भर भारताच्या आत्मनिर्भर झालेल्या पहिल्या महिलेची कथा म्हणजेच 'कोंदण'. या चित्रपटाची कथा सत्य घटनेशी प्रेरित असून अगदी वास्तवदर्शी पात्रे आपल्याला यात दिसून येतात. शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर त्याची बायको त्याच्या दोन्ही लहान मुलांना घेऊन एकटी कोणावरही अवलंबून न राहता, संकटाना हसून तोंड देत कशी आत्मनिर्भर होते? हे या कथेत आपणांस पाहायला मिळते.या कथेत कृष्णा पवार हा शेतकरी दुष्काळामुळे, कर्ज न फेडता आल्याने आत्महत्या करतो. कृष्णाच्या त्यात बऱ्याच अशक्य वाटणाऱ्या आणि जीवघेण्या अडचणी देखील येतात. परंतु या सर्व अडचणींवर मात करून रूक्मिणी आणि दिपक आत्मनिर्भरतेने कशी शेती पिकवतात. हे आपणांस पाहायला मिळते. 


             चित्रपटाची निर्मिती संस्था नाट्यवेद आर्टस् फिल्म प्रोडक्शन हाऊस असून निर्माते अशोक यादव आहेत. चित्रपटात मुख्य भुमिकेत समिक्षा कदम, विक्रांत केदार, सतीश निकम व बालकलाकार गुरुनाथ हिंदळेकर, आणि नागेवाड़ी गावातील इतर कलाकारांचा देखील समावेश आहे. चित्रपटात "मन आभाळ हे एकमेव गाणं आहे जे चित्रपटाला वेगळ्या उंचीवर घेऊन जाते. या गाण्याचे गीतकार व संगीतकार एकनाथ मोरे व कुणाल खाडे आहेत. चित्रपटाचे पार्श्वसंगीत चिराग सोनी व राजेंद्र साळुंखे यांनी दिले. त्यासोबतच डॉ. शांताराम कारंडे फॅन्स फाऊंडेशन व उत्तुंग थिएटर यांचे सुद्धा विशेष सहकार्य चित्रपटाला लाभले आहे.


याप्रसंगी भाजपाचे कामगार नेते


मा. निलेशभाऊ निम्हण, भाजपाचे युवा नेते मा. अविनाश लोंढे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी निलेशभाऊ निम्हण यांनी कोंदण चित्रपटातील सर्व कलाकारांचे पुण्यनगरीत स्वागत केले आणि  गणेशोत्सवा निमित्ताने श्रीच्या चरणी प्रार्थना केली की, कोरोनाचे विघ्न लवकरच सर्व देश - महाराष्ट्र आणि जगातून नष्ट होऊ दे.


सर्व गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.