पुणे प्रवाह न्युज पोर्टल
शोले !
आज, १५ ऑगस्टच्या दिवशी शोले रिलीज झाल्याला ४५ वर्ष झाली.
...पण एक माणूस असाय ज्याचा 'शोले'च्या यशात अक्षरश: सिंहाचा वाटा आहे.. प्रचंड कष्ट आहेत त्याचे शोलेमध्ये..पण तो कायम पडद्यामागं राहीला.. कायम ! तो माणूस मराठी आहे !! द ग्रेट एडिटर एम. एस. तथा माधवराव शिंदे !!!
..खुप कमी जणांना माहिती असेल, 'शोले' ला त्या वर्षी 'फिल्मफेअर'ची ९ नामांकने होती पण ॲवाॅर्ड फक्त एकच मिळालं.. ते माधवरावांना होतं.
ज्यांना त्या काळातल्या अतिशय किचकट एडिटींग पद्धतीविषयी कल्पना नसेल त्यांच्यासाठी सांगतो..शोले सारख्या भव्य 'कॅनव्हास' असलेला सिनेमा एडीट करणं हे त्या काळात खायचं काम नव्हतं ! लै जबरदस्त मेहनत केली या माणसानं.. शूट झालेली ती फिल्म होती तब्बल ३००,००० फूट ! सोप्या भाषेत सांगायचं तर ती फिल्म जर सरळ उलगडत रस्त्यावर पसरली तर तब्बल ९२ कि.मी. भरेल. अशा डोंगराएवढ्या राॅ स्टाॅक ची प्रत्येक फ्रेम - प्रति एक फ्रेम - 'अभ्यासून', कापून ,जोडली या माणसानं... भल्याभल्यांना तोंडात बोटं घालायला लावेल असं काम शिंदेंसारख्या आपल्या मराठी माणसानं केलं. त्यांना पगार होता दरमहा २००० रूपये..
माधवरावांचे कित्येक 'कट्स' आजही 'एडिटींग अभ्याक्रमात' अभ्यासाला आहेत...दुर्दैवानं या महान माणसाचा अंत अतिशय दुर्लक्षित आणि हलाखीच्या परिस्थितीत झाला...'