पुणे प्रवाह न्युज पोर्टल
ज्योतिबाच्या नावानं चांगभलं
स्टार प्रवाह प्रस्तुत आणि कोठारे व्हिजन्सची निर्मिती असलेल्या ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या आगामी मालिकेचा भूमीपूजन सोहळा नुकताच कोल्हापूर चित्रनगरीत पार पडला. या खास प्रसंगी कोठारेंचं संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं. कोठारे व्हिजन्सचं कोल्हापुराशी तसं खूप जुनं व घट्ट नातं आहे. ज्योतिबाचं देवस्थानदेखिल या कोल्हापूर नगरीत आहे त्यामुळेच मालिकेचं शूटिंगही कोल्हापुरात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोल्हापूर चित्रनगरीत ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या आगामी मालिकेचा भव्यदिव्य सेट लवकरच उभा रहाणार असून स्टार प्रवाह आणि कोठारे व्हिजन्सची टीम या नव्या पौराणिक मालिकेसाठी जोमाने कामाला लागली आहे. लवकरच शूटिंगचा श्रीगणेशा होणार असून ज्योतिबाची भूमिका कोण साकारणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.