भारती विद्यापीठ आयएमईडी मध्ये* *सप्टेबर पासून नवीन शैक्षणिक वर्ष*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


प्रेस नोट


*


पुणे :


भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या इस्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (आय एम ईडी )मध्ये एमबीए आणि एमसीए या अभ्यासक्रमांच्या नवीन शैक्षणिक वर्षाला 1 सप्टेंबर पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती आय एमईडी चे संचालक डॉ.सचिन वेर्णेकर यांनी दिली.


 


 आय एमईडीमध्ये या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया 25 ऑगस्ट पर्यंत संपत आहे. त्यानंतर 1 सप्टेंबर पासून नवीन शैक्षणिक वर्ष आणि अध्यापन प्रक्रिया सुरू होईल, असे डॉ वेर्णेकर यांनी पत्रकाद्वारे सांगितले. कोरोना विषाणूच्या परिस्थिती मध्ये शैक्षणिक प्रक्रिया न थांबवता अत्याधुनिक ऑनलाइन प्रणालीचा वापर करून अध्यापन सुरू ठेवले. मायक्रोसॉफ्ट टीम ,वेबेक्स, झूम अशा माध्यमांचा उपयोग प्रभावी पणे करण्यात आला, अशी माहिती या पत्रकात देण्यात आली.


................................................