सोन्याच्या दरात २.१५ टक्क्यांची वृद्धी

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 



 


मुंबई, १८ ऑगस्ट २०२०: सोमवारी स्पॉट गोल्डने २.१५ टक्क्यांची वृद्धी नोंदवली. अमेरिकन डॉलरची घसरण झाल्याने सोने प्रति औंस १९८५.५ डॉलरवर बंद झाले. अमेरिकेच्या ट्रेझरी उत्पादनांमध्ये पिवळ्या धातूच्या आशा वाढल्या. एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले की न्यूयॉर्कच्या फेडरल रिझर्व्हने पोस्ट केलेल्या नकारात्मक आकडेवारीनेही पिवळ्या धातूला थोडा आधार दिला. न्यूयॉर्क फेडच्या एम्पायर स्टेटमधील व्यवसायाची स्थिती जुलैच्या १७.२ वरून ऑगस्ट २०२० मध्ये ३.७ वर घसरली. नवीन ऑर्डर जुलै २०२० मधील १३.९ वरून ऑगस्ट २०२० मध्ये -१.७ वर पोहोचल्या.


 


कच्चे तेल: डब्ल्यूटीआय क्रूडचे दर सोमवारी २.१ टक्क्यांनी वाढून ४२,९ डॉलर प्रति बॅरलवर बंद झाले. चीनकडून मागणी वाढल्यामुळे बाजारातील क्रूड तेलाची किंमत वाढली. ओपेक समूहाने मान्य केलेल्या उत्पादन कपातीमुळेही क्रूड तेलाच्या किंमतीना आधार मिळाला. आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सी आणि पेट्रोलियम निर्यात देशांच्या संघटनेने पूर्वी २०२० च्या कच्च्या तेलाच्या मागणीचा अंदाज कमी दर्शवल्यामुळेही क्रूडमधील नफ्याचे प्रमाण मर्यादित राहिले. तथापि, अमेरिकी डॉलरचे मूल्य घसरल्याने तसेच चीनकडून मागणीत वाढ झाल्याने क्रूडच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे.


 


बेस मेटल्स: एसएमईवरील बेस मेटलच्या किंमती सकारात्मक राहिल्या. या समुहात झिंकने बाजारात सर्वाधिक कमाई केली. चीनमधील कारखान्यातील कामकाजाचा विस्तार झाल्याने मागणी वाढली. त्यामुळेही धातूंच्या किंमतींना आधार मिळाला. फिलिपाइन्सने २०२० च्या पहिल्या अर्ध्या वर्षात कच्च्या स्वरुपातील निकेलचे उत्पादन २८% वाढवल्याने निकेलच्या किंमती वाढवण्यात आल्या. इंडोनेशियाने बंदी घातल्यानंतर २०२०च्या सुरुवातीला इंडोनेशियातील कच्च्या निकेलची मागणी वाढली.


 


तांबे: एलएमई कॉपरचे दर सोमवारी १.२५ टक्क्यांनी वाढून ६४४६ डॉलर प्रति टनांवर बंद झाले. चीनने दर्शवलेल्या वाढीव आर्थिक आकडेवारीमुळे आणि एलएमईवरील यादीत घट होत असल्यामुळे तांब्याच्या किंमती जास्त वाढल्या. एलएमईवरील तांबे यादी १२ वर्षांमधील सर्वात निचांकी पातळीवर ११०००० टनांवर पोहोचली.