प्रथेप्रमाणे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या वतीने मानाच्या तीन गणपतींना मानाचे ताट भेट

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



पुणे – हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या वतीने प्रथेप्रमाणे यंदाही मानाच्या तीन गणपतींना मानाचे ताट देण्यात आले. यामध्ये ग्रामदैवत, मानाचा पहिला गणपती कसबा गणपती, ग्रामदेवता मानाचा दूसरा गणपती तांबडी जोगेश्वरी गणपती आणि मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा गणपती यांचा समावेश आहे. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे अध्यक्ष संजीव जावळे, उत्सवप्रमुख पुनीत बालन यांच्या हस्ते ही मानाची ताटं देण्यात आली. आज सायंकाळी पाच वाजता मानाचा पहिला गणपती श्री कसबा गणपती येथे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांना तसेच सहा वाजता मानाचा दूसरा गणपती तांबडी जोगेश्वरी येथे अध्यक्ष राजाभाऊ टिकार यांना, तर मानाचा पाचवा गणपती केसरी वाडा येथे साडे सहा वाजता रोहित टिळक यांना ही मानाची ताटं देण्यात आली. या प्रसंगी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे विश्वस्त मिलिंद सातव, सूरज रेणुसे आणि लीड मीडियाचे विनोद सातव यांच्यासह श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.