संग्राम शेवाळे यांनी केला माजी पंतप्रधान देवेगौडा साहेबांना फोन

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


**.**


(पुणे):-महाराष्ट्रात कोरोनाच्या काळात जेईई आणि नीट विद्यार्थी यांच्या परीक्षा बाबत चांगले रान तापले आहे.जनता दल (से) विद्यार्थी संघटना महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष संग्राम शेवाळे यांची नीट आणि जेईई परीक्षा देणारे विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांनी भेट घेतली.आणि परीक्षा देत असताना कोरोनाच्या काळात किती अडचणी येणार आहेत यांची सविस्तर माहिती दिली.शेवाळे यांनी कोणताही विलंब न लावता देशाचे माजी पंतप्रधान मा.देवेगौडा (साहेब) यांना फोन लावला.जेईई आणि नीट विद्यार्थी यांची बाजू मांडली.यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील कोरोनाची परस्थिती सांगितली.कोरोनाच्या काळात परीक्षा घेतली तर लाखो विद्यार्थी आणि पालक एकत्र येथील.आणि भयंकर परस्थिती उदभवू शकते.त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी विनंती केली.नुकत्याच पुढे घेण्यात येणाऱ्या mpsc च्या परीक्षेची ही माहिती सांगितली. देवेगौडा साहेब लवकर या बाबतीत केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्याशी बोलणार आहेत.आणि महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत असे शेवाळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.