पुणे प्रवाह न्युज पोर्टल
~ अस्थिरतेमुळे निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये उदासीनता ~
मुंबई, ५ ऑगस्ट २०२०: भारतीय बाजाराने इंड्रा डेमधील नफा गमावला आणि अस्थिरतेमुळे आजच्या व्यापारी सत्रात उदासीन व्यवहार दर्शवला. निफ्टी ०.०६% किंवा ६.४०% नी वाढला आणि ११,१०१.६५ अंकांवर स्थिरावला. म्हणजेच तो ११,१०० च्या पातळीपुढेच राहिला. एसअँडपी बीएसई सेन्सेक्स मात्र ०.०७% किंवा २४.५८ अंकांनी घसरला व ३७,६६३.३३ अंकांवर स्थिरावला.
एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की आज जवळपास ९९४ शेअर्स घसरले, १६११ शेअर्सनी नफा कमावला तर १५२ शेअर्स स्थिर राहिले. हिंडाल्को इंडस्ट्रिज (९.०९%), टाटा स्टील (६.७०%), आयशर मोटर्स (४.८२%), अदानी पोर्ट्स (३.८३%), आणि टाटा मोटर्स (३.६८%) हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. तर युपीएल (१.४५%), एचडीएफसी लाइफ (१.४८%), पॉवर ग्रिड कॉर्प (०.९८%), रिलायन्स इंडस्ट्रीज (०.८६%) आणि एचडीएफसी बँक (१.०३%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले. क्षेत्रीय आकडेवारी पाहता, धातू, वाहन, इन्फ्रा आणि आयटी क्षेत्र नफ्यात राहिले तर ऊर्जा आणि औषध क्षेत्रानी तोटा दर्शवला. बीएसई मिडकॅप ०.४६% नी वधारले आणि बीएसई स्मॉलकॅपनी ०.९१% ची वृद्धी दर्शवली.
पनामा पेट्रोकेम: कंपनीचा २०२१ या वित्तीय वर्षातील पहिल्या तिमाहितील निव्वळ नफा ५०.६% नी घसरला तर या काळातील महसूल ४०.८% नी घसरला. तथापि, कंपनीचे स्टॉक्स २.८५% नी वधारले व त्यांनी ४१.५० रुपयांवर व्यापार केला.
फोर्स मोटर्स: फोर्स मोटर्सचा जुलै महिन्यातील एकूण विक्री ५५.७% नी घसरली. ती २,५५१ युनिटवरून १,१२९ युनिटपर्यंत आली. परिणामी आजच्या व्यापारी सत्रात कंपनीचे स्टॉक्स २.७६% नी वाढले व त्यांनी ९४०.०० रुपयांवर व्यापार केला.
अॅक्सिस बँक लिमिटेड: अॅक्सिस बँकेने १०,००० कोटी रुपयांचा निधी उभारण्यासाठी क्यूआयपी किंवा क्लालिफाइड इस्टिट्यूशनल प्लेसमेंट लाँच केले. परिणामी बँकेचे स्टॉक्स १.१८% नी वधारले व त्यांनी ४३४.२० रुपयांवर व्यापार केला.
सन फार्मा अॅडव्हान्स्ड रिसर्च कंपनी लिमिटेड: कंपनीने २०२१ या वित्तीय वर्षातील पहिल्या तिमाहीत सर्वाधिक कमाई झाल्याची नोंद केली. कंपनीने ५६.६९ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला तर कामकाजातून १८५.४५ कोटी रुपयांचा महसूल कमावला. परिणामी कंपनीचे स्टॉक्स ६.६४% नी वाढले व त्यांनी १८६.४० रुपयांवर व्यापार केला.
लुपिन लिमिटेड: या फार्मा कंपनीने कोव्हिहॉल्ट या ब्रँड नावाने भारतात फेव्हिपिरावीर लाँच केले. हे औषध सौम्य ते मध्य स्वरुपातील कोव्हिड-१९ संसर्गावर उपचारांसाठी वापरले जाऊ शकते. तथापि, कंपनीचे स्टॉक्स १.३६% नी घसरले व त्यांनी ९२८.०० रुपयांवर व्यापार केला.
पीआय इंडस्ट्रिज: कंपनीने २०२१ या वित्तीय वर्षातील पहिल्या तिमाहीत निव्वळ एकत्रित नफ्यात ४३% ची वाढ झाल्याचे तसेच कंपनीचा महसूल ४०% नी वाढल्याचे नोंदवले. परिणामी कंपनीचे स्टॉक्स ३.५६% नी वाढले व त्यांनी १,८९९.९५ रुपयांवर व्यापार केला.
इआयडी पॅरी : २०२१ या वित्तीय वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीच्या एकत्रित महसुलात ३२.५% ची वाढ झाली. कंपनीचा एकत्रित निव्वळ नफाही २९.३ कोटी रुपये झाला. तरीही ईआयडी पॅरीचे स्टॉक्स ३.६५% नी घसरले व त्यांनी २९४.०० रुपयांवर व्यापार केला.
भारतीय रुपया: सकारात्मक देशांतर्गत इक्विटी मार्केटमुळे भारतीय रुपयाने अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ७४.८८ रुपये एवढे उच्चांकी मूल्य कमावले.
सोने: आजच्या व्यापारी सत्रात सोन्याने एमसीएक्सवर सोन्याने ५४,७०० रुपयाचे नवे उच्चांकी मूल्य गाठले. इंटरनॅशनल स्पॉट किंमतीत वाढ आणि डॉलर कमकुवत झाल्याने सोन्याच्या दरात ही वाढ दिसून आली.
जागतिक बाजारात सकारात्मक संकेत : आजच्या व्यापारी सत्रात जागतिक बाजाराने उच्चांकी कामगिरी केली. प्रोत्साहनपर पॅकेजेसमुळे अमेरिकी बाजार उच्चांकी स्थितीत बंद झाला. नॅसडॅकने ०.३५% ची वृद्धी घेतली, एफटीएसई एमआयबीत ०.४६% ची वाढ झाली, एफटीएसई १०० चे शेअर्सही ०.९६% नी वाढले. हँग सेंगचे शेअर्स ०.६२% नी वाढले तर निक्केई २२५% चे शेअर्स ०.२६% नी घसरले.