ये आजादी झुठी है , देश की जनता भुकी है !*         *--- साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे .

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


 


**


मित्रानो,


        दि. १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपल्याला *" तथाकथित" स्वातंत्र मिळाले. त्याचा दुसऱ्याच दिवशी म्हणजे दि. १६ ऑगस्ट १९४७ रोजी साहित्य सम्राट, महान कामगार नेते,सत्यशोथक अण्णाभाऊंनी *"ये आझादी झूठी है, देश की जनता भुकी है" !* घोषणा देत महाराष्ट्राच्या राजधानीत मुबईत कामगारांचा प्रचंड मोर्चा काढला.


        *" जग बदल घालुनी घाव, सांगून गेले मला भीमराव"* अण्णाभाऊ च्या सर्व घोषणा मराठीत आहेत परन्तु *" ये आझादी झूठी है, देश की जनता भूकी है" !* एवढीच घोषणा हिंदीत आहे कारण हा संपूर्ण देशाचा प्रश्न होता. 


        अण्णाभाऊंच्या या स्वातंत्र्य निषेध मोर्चाला कम्युनिस्टांनी प्रखर विरोध केला होता. कम्युनिस्टांनी कामगारांना आपापल्या गिरण्या पुढे स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा करण्याचे आदेश दिले होते. जेणे करून लोक अण्णाभाऊंच्या स्वातंत्र्याचा निषेध सहभागी होणार नाहीत. शेवटी कम्युनिस्टांनी या मोर्चात सहभागी हो नये असा फतवाच काढला होता तरी सुद्धा अण्णाभाऊंच्या या मोर्चात ६०००० वर कामगार उपस्थित होते.


       तथाकथित स्वातंत्र्याचा ७३ वर्षानंतरही आपल्या देशात दररोज शेतकरी आत्महत्या करीत आहेत. *जर आपण खरेच स्वातंत्र झालो आहोत तर या देशात दलितांवर - महिलांवर अत्याचार का होत आहेत? एवढी प्रचंड विषमता का ? भेदभाव का ? गैर बराबरी का ? एक श्रीमंत व एक गरीब का ? एक तुपाशी व एक उपाशी का ? बेरोजगारी का?* 


       आजही खेड्यापाड्यात वयस्कर लोक *"इंग्रजांचे राज्य* *बरे होते* असे का म्हणतात? भारत कर्जबाजारी का ? बळी राजाच्या काळात भारतात सोन्याचा धूर निघत होता. सम्राट अशोकाच्या काळात जो भारत " सोनेकीं चिडीया" थी, आज तोच भारत भिकारी- कंगाल का झाला ? दरोडे, खून, मारामाऱ्या, बलात्कार, अन्याय- अत्याचार , भ्रष्टाचार का होत आहेत? 


       माझ्या सारख्या गटई कामगाराला स्वतःच्या बायकोला साडी घ्यायला अनेक वेळा विचार करावा लागतो, आणि मुकेश अंबानी त्याचा बायकोला ३५०० कोटीचे हेलिकॉप्टर वाढदिवसाला भेट म्हणून देतो हे कसे ? बालके कुपोषण, उपासमारीने, भुखमरीने मरत आहेत? 


      हे सर्व होत आहे कारण देशात ब्राम्हणाची अनियंत्रित सत्ता आहे. *" ये आझादी झूठी है, देश की जनता भूखी है " !* आज अण्णाभाऊ साठे चे भाकीत खरे ठरले आहे. 


      *ब्राम्हण इंग्रजांचे गुलाम होते व आम्ही ब्राम्हणांचे गुलाम .*


*म्हणजेच आम्ही गुलामांचे गुलाम . आम्ही सिंगल गुलाम नसून डबल गुलाम होतो .*


        टिळक , आगरकर , सावरकर , गांधी , नेहरू , चटर्जी , बेनर्जी , यांचे आंदोलन हे त्यांचा जातभाई च्या स्वातंत्र्यसाठी चे आंदोलन होते .


तर फुले , पेरियार , शाहू , केशवराव जेथे , दिनकर जवळकर , गाडगे महाराज , डॉ . आंबेडकर , अण्णाभाऊ यांचे आंदोलन हे या देशातील मूलनिवासी - बहुजनांच्या स्वातंत्र्याचे आंदोलन होते .


इंग्रजाची गुलामी ही राजकीय असून ती कायम स्वरूपीची नव्हती परंतु , ब्राम्हणांनी गुलामी ही हजारो वर्षांपासून ची गुलामी होती .


*अधिक माहितीसाठी मा. डी. आर. ओहळ सर लिखित " आधुनिक भारतातील स्वातंत्र्याची दोन आंदोलने " हे पुस्तक अवश्य वाचा .*


 


       *------- प्रकाश समशेर --------*