पुणे प्रवाह न्युज पोर्टल
बहुजन कष्टकऱ्यांना शिक्षणातून हद्द पार करणारे नवीन शैक्षणिक धोरण रद्द करण्याकरिता दलित युवक आंदोलनाच्यावतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नवीन शैक्षणिक धोरणाच्या अहवालाची प्रतीकात्मक होळी
बहुजन कष्टकऱ्यांना शिक्षणातून हद्द पार करणारे नवीन शैक्षणिक धोरण रद्द करण्याकरिता दलित युवक आंदोलनाच्यावतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नवीन शैक्षणिक धोरणाच्या अहवालाची प्रतीकात्मक होळी करण्यात आली . यावेळी पुणे जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र देशमुख यांना निवेदन देण्यात आले .
दलित युवक आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष सचिन बगाडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले . या आंदोलनात दलित युवक आंदोलनाचे पुणे जिल्हा अध्यक्ष नागेश गायकवाड , पुणे शहराध्यक्ष प्रभू शिंदे , पुणे जिल्हा उपाध्यक्ष मनोज तुपसौंदर , पुणे जिल्हा कार्याध्यक्ष सतीश तुपसौंदर, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष श्रावण बगाडे , महिलाध्यक्ष अनिता लोंढे , सुरेश खंडागळे , दत्ता शिंदे , निलेश रंधवे , संभाजी म्हस्के , श्रीधर जाधव , दीपक खुडे , संजय एडके आदी कार्यकर्ते उपस्थित होते .
नवीन शैक्षणिक धोरण रद्द करा , शिक्षणाचे राष्ट्रीयकरण करा , शिक्षणावरील खर्चात वाढ करून तो १० टक्के पर्यंत करण्यात यावा , शिक्षण प्राध्यापक भरती केंद्रीय पध्दतीने करण्यात यावी , राज्य घटनेतील समता , स्वात्रंत, बंधुता आदी मूल्यावर आधारित शिक्षणाचा आशय असावा अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या .