माथेरान मध्ये 140 कोरोना योद्धे यांचा सन्मान...

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



डॉक्टर,आरोग्य कर्मचारी,सफाई कर्मचारी,अंगणवाडी सेविका यांचा सन्मान


शहरात वृक्षारोपण


कर्जत,ता.26 गणेश पवार


               माथेरान नगरपरिषदेचे बांधकाम समिती सभापती आणि शिवसेनेचे शहर संपर्कप्रमुख प्रसाद सावंत मित्र मंडळाच्या वतीने माथेरान मधील कोरोना योद्धा यांचा सन्मान करण्यात आला.माथेरान मध्ये आरोग्य विभाग,नगरपरिषद कर्मचारी आणि सफाई कर्मचारी आणि पोलीस यांनी कोरोना काळात काम केले आहे. दरम्यान,या सर्वांना वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करून कोरोना योद्धा सन्मानित करण्यात आले आणि वृक्षारोपण करण्यात आले.


                   माथेरान मध्ये कोरोना काळात गेली सहा महिने अनेक सरकारी कर्मचारी यांनी काम केले आहे.त्यामुळे त्या सर्व यंत्रणांचा सन्मान करण्याचा निर्णय माथेरान नगरपरिषदेचे बांधकाम समिती सभापती आणि गटनेते प्रसाद सावंत यांच्या मित्र मंडळाच्या वतीने हाती घेतला होता.त्यानुसार आज 26 सप्टेंबर रोजी माथेरान नगरपरिषद दवाखाना मध्ये काम करणारे सर्व आरोग्य कर्मचारी तसेच डॉ उदय तांबे,डॉ प्रशांत यादव यांचा सन्मान माथेरान गिरीस्थान नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांचे हस्ते करण्यात आला.त्यावेळी नगरपरिषद दवाखाना या ठिकाणी शिवसेनेचे शहरउपप्रमुख कुलदीप जाधव,नगरसेवक शकील शेख,संदीप कदम,नरेश काळे, यांच्यासह वन व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष लक्ष्मण कदम,विजय सावंत,राजेश काळे,आदी उपस्थित होते.त्यानंतर माथेरान पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत काळे आणि माथेरान नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव यांच्या देखील कोरोना योध्या सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.


                माथेरान नगरपरिषदेच्या कम्युनिटी सेंटर येथे माथेरान नगरपरिषद आरोग्य विभागाचे कर्मचारी,सफाई कर्मचारी,अंगणवाडी सेविका मदतनीस अशा 100 जणांना कोरोना योद्धा प्रमाणपत्र देऊन प्रसाद सावंत मित्र मंडळाचे वतीने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी नगराध्यक्ष प्रेरणा सावंत,गटनेते प्रसाद सावंत, माजी नगरसेवक आणि शिवसेनेचे उपशहर प्रमुख कुलदीप जाधव,प्रदीप घावरे यांच्यासह वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष योगेश जाधव,माजी नगरसेवक प्रकाश सुतार,राजेश चौधरी,तसेच नगरसेवक शकील पटेल,नरेश काळे,संदीप कदम,आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना प्रसाद सावंत यांनी कोरोना काळात आपण केलेल्या कामाचे कितीही अभिनंदन केले तरी कमी आहे.त्यामुळे अजूनही कोरोनाचा काळ संपला नाही.त्यामुळे तुम्ही शहरातील नागरिकांची काळजी घेत असताना स्वतःची काळजी घ्या असे आवाहन केले.तर वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश जाधव यांनी कोरोना योद्धा यांचा सन्मान करण्याची गरज असून प्रसादभाइ यांनी पुढाकार घेतला असून त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे असे मत मांडले.


                 महात्मा गांधी रस्ता येथे प्रसाद सावंत मित्र मंडळाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.त्यावेळी प्रसाद सावंत मित्र मंडळाचे समीर पन्हाळकर,उमेश सावंत,राजेश काळे,मुकुंद रांजणे,राजेश सावंत, आदी उपस्थित होते.


फोटो ओळ


कोरोना योद्धा यांचा सन्मान