पुणे प्रवाह न्युज पोर्टल
**
पुणे:-जनता दल (से) विद्यार्थी संघटना महाराष्ट्र राज्य विद्यार्थी यांच्या हितासाठी खूप वेगवेगळ्या पद्धतीने लढत आलेली आहे.त्यातील काही मागण्यांना यश आले काही प्रलंबित आहेत त्या साठी ते वेळोवेळी पाठपुरावा करत आहेत.असेच कोरोनाच्या काळात महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी यांच्या समोर काही सामान्य समस्या निर्माण झाल्या.त्या समस्या महाराष्ट्र राज्यातील विविध भागातून विविध माध्यमातून प्रदेशाध्यक्ष संग्राम शेवाळे यांच्याकडे आल्या.त्यांनी त्यांची संपूर्ण माहिती घेऊन आणि अभ्यास करून या विद्यार्थी हितासाठी राज्यव्यापी हितकारक अभियान राबवले.याची सुरुवात पुणे विद्यापीठाचे कुलगुरू मा.कळमळकर सर यांना भेटून केली.उर्वरित राज्यातील 11 सामान्य विद्यापीठ यांना संग्राम शेवाळे यांनी मागण्या रजिस्टर पोस्टाने पाठवून अभियानाची सांगता केली.उर्वरित विद्यापीठाच्या भागातील पदाधिकारी यांना पाठपुरावा करण्यासाठी आणि कुलगुरू सर यांना भेटून चर्चा करण्यासाठी आदेश दिले आहेत.संग्राम शेवाळे म्हणाले की हे अभियान राबवायचे हेतू असा की कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांना प्रामाणिक न्याय मिळाला पाहिजे.आणि या मागण्या मान्य केल्या तर विद्यार्थी यांचे सामाजिक,आर्थिक,शैक्षणिक नुकसान थांबणार आहे.विद्यार्थी हित कायम हे वाक्य डोळ्यासमोर ठेऊन शेवटपर्यंत या अभियानाच्या माध्यमातून लढा देणार आहे.असे आमच्या माध्यमांशी बोलताना सांगितले.