पुणे प्रवाह न्युज पोर्टल
वाहीद बियाबानी, पुणे यांनी CET फार्म भरण्याची मुदतवाढ होण्याकरिता केलेल्या प्रयत्नांना यश
CET ONLINE ADMISSION FORM भरण्याची मुदत ही ८ जुन २०२० पर्यंत होती आणि Covid 19 च्या लॉकडावुन मुळे राज्यातील लाखो विदयार्थी फार्म भरण्यापासुन वंचित राहीले .
ही वस्तुस्थिती दि मुस्लिम वेल्फअर सोसायटीचे अध्यक्ष वाहीद बियाबानी यांनी निवेदनाद्वारे राज्य सरकारच्या लक्षात आणून दिले असता या निवेदनाची नोंद घेत राज्य सरकारने CET फार्म ची मुदतवाढ ही ७ व ८सप्टेंबर २०२०पर्यंत केलेली आहे.
त्याकरिता वाहीद बियाबानी यांनी राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे , उपमुख्यमंत्री अजित पवार , उच्चशिक्षण मंत्री श्री उदय सांमत , अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक , खासदार सुप्रिया सुळे, खा. वंदना चव्हाण, शिक्षक आमदार कपिल पाटील , आमदार सुनिल टिंगरे , माजी आमदार मोहन जोशी व माजी आमदार अनंतराव गाडगीळ साहेब या सर्व मान्यवरांचा सहकार्य बद्दल शतशः आभार