पुणे प्रवाह न्युज पोर्टल
प्रेस नोट
पुणे :- राज्यातील तमाशा व शाहीर कलाकाराने दुसऱ्या बाजीराव पेशवाई पासून दिवसभर शेतात काबाड कष्ट करणाऱ्या शेतकरी राजा शेतमजूर यांना जगण्याची उमेद दिली.अशा याकरिता वरील परिषदेच्या वतीने जेष्ठ नेते खा.शरदचंद्रजी पवार साहेब ,राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब,ना.जयंत पाटील साहेब ,ना.शंभूराजे देसाई साहेब,ना.बाळासाहेब पाटील ,ना.अमित देशमुख, ना.राजेंद्र पाटील यद्रावरकर,ना.बाळासाहेब थोरात या मंत्री महोदय यांना व जुन्नरचे आ. अतुलशेठ बेनके ,खा.अमोल कोल्हे यांना परिषदेच्या शिष्ट मंडळाने भेटून निवेदन दिले आहे.
तरी दि.14 -9-2020 रोजी सांस्कृतिक मंत्री महोदय ना.अमित देशमुख यांनी लातूर याठिकाणी वरील परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून आमच्या मागण्या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
सदर मागण्या:-
1)लोककला अनुदान पॅकेज कायमस्वरूपी 2008 च्या धरतीवर चालू करणेबाबत
2)महामंडळ किंवा बँक यातून 50 लाख रुपये तंबूच्या फडासाठी 20 लाख रूपये 8 महिने कार्यक्रम करणाऱ्या फडासाठी 5 लाख रुपये 1 महिना कार्यक्रम करणाऱ्या फडासाठी कर्ज रुपात मिळावे.
3)तमाशा लोककलावंत यांना प्रधानमंत्री घरकुल योजनेमध्ये 5 टक्के आरक्षण मिळावे.
4)तमाशा लोककलावंतास गावठाण हद्दीतील बेघरासाठी जागा मिळावी.
5)अ. ब.क अशी वर्गवारी न करता 5000 ते 3500 रुपये मानधन कालावंतास दरमहा मिळावे.
6)कोरोनाच्या महामारीमुळे राज्यातील तमाशा फड मालक व कलाकार आर्थिक संकटात सापडल्यामुळे कुटूंबासाठी प्रत्येकी कलाकारास 15000/-रुपये राज्य सांस्कृतिक विभागाच्या वतीने कलावंताच्या बँक खात्यात जमा करण्याची मागणी आहे.
वरील सर्व मागण्या ना.अमित देशमुख यांनी मान्य करून मंत्री मंडळाची मान्यता घेऊ असे आम्हाला बैठकीत वेळी आश्वासन दिले आहे.
तसेच म्हाडा व सिडको ठेवण्याचे गृहनिर्माण मंत्री ना.जितेंद्र आव्हाड यांनी मान्य केले आहे.
सदर शिष्ट मंडळाचे अविष्कार मुळे,संभाजीराजे जाधव ,मोहित नारायणगावकर ,आनंद भिसे पाटील,लता विरळीकर,रेखा चव्हाण उपस्थित होते.
त्यामुळे 19-9-2020 रोजी छत्रपती शिवाजी महाराज,फुले,शाहू,आंबेडकर,अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून स्व. विठाबाई नारायणगावकर यांच्या पुतळ्याजवळ पेठे व लाडू वाटप आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे.अशी माहिती तमाशा परिषदेचे अध्यक्ष अविष्कार मुळे यांनी दिली .