पुणे प्रवाह न्युज पोर्टल
परिषदेत ‘राष्ट्रीय सुरक्षेसाठी माध्यमांची भूमिका’ या वर मान्यवरांचा सूर
पुणे, 23 सप्टेंबर: “भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा बाबींविषयीचे कव्हरेज, चर्चा आणि विश्लेषणाच्या संदर्भात माध्यमांनी राष्ट्रीय स्वारस्य आणि राष्ट्रीय सुरक्षा या दोहोंबद्दल असंवेदनशीलता दर्शविली आहे. यात इलेक्ट्रॉनिक माध्यमांची भूमिका ही अग्रणी आहे. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेसाठी माध्यमांनी स्वतःची लक्ष्मण रेषा ओळखणे गरजेचे आहे.” असा सूर ‘राष्ट्रीय सुरक्षेसाठी माध्यमांची भूमिका ’ या सत्रात मान्यवरांनी काढला.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चार दिवसीय ऑनलाईन,“दूसरी राष्ट्रीय माध्यम व पत्रकारिता परिषदेच्या” तिसर्या दिवशीच्या सत्रामध्ये इंडियन ऑर्ब्जर पोस्टचे मुख्य संपादक ओंकारेश्वर पांडे, माजी अम्बेसेडर अनूप के मुद्गल, मेजर जनरल (निवृत्त) दिलावर सिंग, वरिष्ठ पत्रकार डॉ. सतीश मिश्रा, लेखक कर्नल जयबास सिंग आणि वरिष्ठ पत्रकार व राजकीय संपादक संजय सिंग उपस्थित होते.
तसेच, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड आणि कुलगुरू प्रा.डॉ.एन.टी.राव, प्र-कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस व लिबरल आर्ट, फाइन आर्ट आणि मिडिया अॅण्ड जर्नालिझम स्कूलच्या अधिष्ठाता प्रा.डॉ. अनुराधा पराशर हे उपस्थित होते.
संजय सिंग म्हणाले,“ राष्ट्रीय डिफेन्स पत्रकारितेमध्ये 90 टक्के पत्रकार हे रिर्पोटिंगसाठी लायक आहेत. पण, एलओसी या मुद्यांवर काही बोटावर मोजक्या चॅनल्सने चुकीच्या बातम्या दाखविल्या आहेत. परंतू सीमा प्रश्नावर आता उत्तम रिर्पोटिंग समोर येतांना दिसत आहे. डिफेन्स मध्ये कोणताही ऐरागैरा पत्रकार जाउच शकत नाही. डिफेन्स मधून पीआरच्या माध्यमातूनच रिपोर्टरला बातम्या मिळतात. प्रथम दाखविण्याच्या शर्यतीत माध्यमांकडून चुकीच्या बातम्या ही दाखविल्या जातात.”
“ वर्तमान काळात माध्यमांकडून जे एक्यूजिवच्या नावाखाली दाखविले जात आहे.त्यामुळे चीन ला देशातील सर्व माहिती आपोआप मिळत आहे. आता प्रश्न येतो की सुरक्षा संदर्भातील बातम्या या आतूनच येऊ शकतात. त्यामुळे पत्रकारांना हे ओळखणे गरजेचे आहे की समाजासमोर आम्हाला काय दयाचे आहे. तसेच, चुकीच्या बातम्या दाखविणार्यांवर पंतप्रधान कार्यालयाकडून नोटिस पाठविले जाणे ही गरजेचे आहे.”
सतिश मिश्रा म्हणाले,“ प्रथम बातमी देण्याच्या ओघात माध्यमांनी आपली विश्वसनियता संपविली आहे. जयपाल सिंग म्हणाले, सध्याच्या काळात चांगल्या डिफेन्स करस्पांडनची गरज आहे. कारण यांची पत्रकारिता ही राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्देला अनुसरूण असते. दिलावर सिंग म्हणाले, राष्ट्रीय सुरक्षेसाठी माध्यमांची भूमिका ही अत्यंत महत्वाची आहे. या सुरक्षेसाठी सोशल मीडियाच्या खांद्यावर अधिक जवाबदारी येते. डिफेन्स पत्रकारितेसाठी स्पेशलायझेशन असणे आवश्यक आहे. तसेच आजच्या काळात हुशार डिफेन्स रिपोर्टरची गरज आहे.”
तत्पूर्वी ‘ भारतातील कम्यूनिटी रेडिओ, काल आज आणि काल’ या विषयावर आयोजित चर्चेत पूजा मुद्रा, हरिणायाच्या अल्फाज ए मिवक्त, यूपी येथील वक्त की आवाजच्या राधा शुक्ला, मधुबन येथील कृष्णा बहन आणि केरळ येथील रेडियो मट्टोलीचे बिजो थॉमस यांनी सहभाग घेतला होता.
कृष्णा बहन म्हणाल्या, “प्रत्येक व्यक्ती हा तंत्रज्ञानाचा वापर करू शकत नाही. तेव्हा ग्रामीण क्षेत्रात कम्यूनिटी रेडिओच्या माध्यमांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे.”
राधा शुक्ला म्हणाल्या,“ कोविड 19 च्या काळात होम क्वारंटाइनच्या काळात महिलांच्या मानसिक आरोग्य आणि करोनाची योग्य माहिती देण्यासाठी कम्यूनिटी रेडिओने महत्वाची भूमिका पार पाडली आहे. तसेच सरकारचे धोरण आणि योजनांना गावा गावापर्यत पोहचविण्यासाठी हे माध्यम उपयुक्त होते. आज 1 ते 8 पर्यंतचे शेकडो मुले याच्या माध्यमातूनच शिक्षण घेत आहेत. ”
सूत्रसंचालन प्रा. आसावरी फडके यांनी केले.