'इनोव्हेशन्स इन ऑटोमोटिव्ह'वर 'टीटीए'तर्फे शनिवारी व्याख्यान

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 



पुणे : टेक्नॉलॉजी ट्रान्स्फर असोसिएशन (टीटीए), डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी (डीओटी) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील रिसर्च पार्क फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 'इनोव्हेशन्स इन ऑटोमोटिव्ह'वर व्याख्यानाचे आयोजन केले आहे. येत्या शनिवारी (ता. १९) दुपारी ३ वाजता झूम मिटद्वारे हे व्याख्यान होणार आहे. प्रो-बिझनेस इनोव्हेशन्सचे संचालक हेमंत पाध्ये बोलणार आहेत. 'डिओटी'चे प्रमुख डॉ. आदित्य अभ्यंकर हे कार्यक्रमाचे उद्घाटक असणार आहेत. यावेळी 'टीटीए'चे यशवंत घारपुरे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अरविंद शाळीग्राम, आदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती 'टीटीए'चे सचिव विलास रबडे यांनी दिली आहे.जागतिक पातळीवर ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील प्रवाह, इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञान, ऑटोमोटिव्ह क्षेत्रात इलेक्ट्रिक व्हेइकल्ससाठीच्या (इव्ही) संधी, आयसीई ते इव्ही मायग्रेशन आदी मुद्यांवर हेमंत पाध्ये विश्लेषण करणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून, यात सहभाग घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी www.tta.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा ९८२००२६२६५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही रबडे यांनी कळविले आहे.