पुण्याच्या मा. महापौर यांची राज्यसभेच्या उपसभापती म्हणून खासदार अॅड.वंदना चव्हाण यांची निवड*

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


*पुण्याच्या मा. महापौर यांची राज्यसभेच्या उपसभापती म्हणून खासदार अॅड.वंदना चव्हाण यांची निवड*


*पुणे : _* राज्यसभेच्या उपसभापती म्हणून खासदार वंदना चव्हाण यांनी शुक्रवारी कामकाज पाहिले. उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी उपसभापतिपदाच्या तालिकेवर निवड केल्यानंतर खासदार चव्हाण यांना प्रथमच ही संधी मिळाली. सदस्यांनी बाके वाजवून त्यांचे स्वागत केले. भारतीय लोकशाहीच्या सर्वोच्च सभागृहाचे पिठासीन अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करून खासदार चव्हाण यांनी 'हे माझे भाग्यच आहे, अशा शब्दात भावना व्यक्त केल्या.


पुण्याच्या माजी महापौर असलेल्या चव्हाण यांच्या खासदारकीची ही दुसरी वेळ आहे. राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असलेले उपराष्ट्रपती सभागृहातील कामगिरी आणि अनुभवाच्या आधारे सहा सदस्यांची उपसभापती म्हणून निवड करतात. उपराष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत या सहापैकी एका सदस्याने राज्यसभेचे कामकाज पहायचे असते. नायडू यांनी या सहा सदस्यांमध्ये चव्हाण यांनी निवड केली आहे. "भारतील लोकशाहीमध्ये राज्यसभेला वरिष्ठ सभागृह म्हणून वेगळीच प्रतिष्ठा, आदर आहे. तो जपण्याचा आपण कायम प्रयत्न करू,' असे चव्हाण यांनी सांगितले.