देशासाठी समर्पण भावनेने कार्य करावे पॉडिचरीच्या उपराज्यपाल किरण बेदी यांचा सल्ला

पुणे प्रवाह न्युज पोर्टल



मिटसॉगतर्फे 12वा राष्ट्रीय पातळीवरील ऑनलाईन सत्कार व परिषदेचा समारोप


 


पुणे, 20 सप्टेंबर:“ देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी समर्पण भावनेने कार्य कसे करावे, हा विचार केंद्रीय लोकसेवा आयोग परिक्षा पास करण्यांनी सदैव करावा.” असा सल्ला पॉडिचरीच्या उपराज्यपाल डॉ. किरण बेदी यांनी दिला.


एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट (मिटसॉग), पुणेतर्फे यूपीएससी स्पर्धा परीक्षा-2019 मधील यशस्वितांच्या 12 व्या राष्ट्रीय स्तरावरील सत्कार आणि प्रोत्साहन सोहळा व ‘प्रशासकीय सेवेच्या परिक्षेची तयारी कशी करावी आणि प्रशासकीय सेवेसमोरील आव्हाने’ या विषयावरील चार दिवसीय परिषदेच्या ऑनलाईन समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या.


या वेळी भारताचे माजी परराष्ट्र सचिव पद्मभूषण श्याम सरेन, भारताचे माजी मुख्य न्यायाधीश दिपक मिश्रा व भारताचे माजी निवडणूक आयुक्त अशोक लवासा हे सन्माननीय अतिथि म्हणून उपस्थित होते.


तसेच, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ. एन.टी.राव, प्रा. रविंद्रनाथ पाटील आणि प्रा.डॉ.शैलश्री हरिदास हे उपस्थित होते.


या प्रसंगी यूपीएससी परिक्षेमध्ये भारतात तिसरी आलेली प्रतिमा वर्मा हिचा सत्कार केला व तिला 21 हजार रूपयांचे पारितोषिक देण्यात आहे.


डॉ. किरण बेदी म्हणाल्या,“ सेवा करतांना सर्वात प्रथम स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देऊन फीट रहावे. या क्षेत्रात रोज शिकण्यासारख्या भरपूर गोष्टी असल्यामुळे सदैव शिकत राहून त्यातील कौशल्य गुण आतमसात करावे. जन सेवा ही महत्वाची असल्याने कार्यक्षेत्रात जाऊन कार्य करावे. या वेळी जर मंत्र्यांना सूचना दयावयाचे असतील तरी ती दयावी त्यांना घाबरून जावू नये किंवा त्यांसाठी आपल्या नियमात बदल करू नका. जनसेवेचे व्रत घेतल्यामुळे कुटुंब आणि सेवेचे संतुलन ठेऊन जीवन व्यतीत करावे. या देशासाठी समर्पण भावनेने कार्य केल्यास भारत हा आत्मनिर्भर बनेल.”


प्रतिमा वर्मा म्हणाली, “ कठोर परिश्रम, निश्चय आणि सातत्य या गोष्टींमुळे जीवनात यश मिळते. किरण बेदी यांच्या पासून प्रेरणा घेऊन या देशाला समोर कसे नेता येईल. यासाठी मी सदैव प्रयत्न करीत राहणार आहे. समाजाचा अविभाज्य अंग असल्यामुळे मी या सेवेत राहून सदैव समाजउन्नतीचे कार्य करीत राहिल.”


      अशोक लवासा म्हणाले,“तुम्ही सिस्टीमला निर्मित करत नाही तर त्यातील एक भाग असतात. त्यामुळे त्यात राहून उत्तम कार्य करावे. या सिस्टीम मध्ये तुम्ही एक पात्र असता त्याला चांगल्या पद्धतीने पार पाडण्याचा प्रयत्न करावा. येथे कोणालाही सल्ला देऊ नका, तर सरळ कार्याची अंमलबजावणी करावी. जीवनाता प्रामाणिकतेला खूप महत्व आहे. त्यामुळे याचा हाथ कधीही सोडू नका. केंद्रीय लोकसेवा आयोगमध्ये जे यशस्वी झाले त्यांना आता हा विचार करावयचा आहे की या सर्वीससाठी मी संपूर्णपणे तयार आहे का. कठोर परिश्रम घेतल्या शिवाय जिवनात कधीही यशस्वी होता येत नाही. कोणतीही समस्या आली तरी तिला घाबरून न जाता ती सोडविण्याचा प्रयत्न करा. जीवनात सदैव शिकत रहा आणि नोकरी करतांना सतर्क रहा.”


प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ कोरोना वायरस मुळे या सृष्टीवर नवी समस्या निर्माण झाली आहे. अशावेळेस नव्या आव्हांनाचा सामना सर्वांना करावयाचा आहे. त्यात प्रशासकीय अधिकार्‍यांची भूमिका ही सर्वात महत्वाची असेल. शिस्त आणि चारित्र्य या दोन गोष्टी आपल्या मध्ये असणे गरजेचे आहे. प्रशासकीय सेवेत कार्य करतांना दृढ विश्वास व समर्पण असणे गरजेचे आहे. 21 व्या शतकाता भारत ज्ञानाचे दालन व विश्वगुरू म्हणून उदयास येईल. त्यामध्ये प्रशासकीय सेवेतील अधिकार्‍यांची भूमिका अत्यंत महत्वाची असेल. समाजात सुख, समाधान आणि शांती कसे नांदेल या वर लक्ष्य केंद्रीत करावे.”


यावेळी भारताचे माजी परराष्ट्र सचिव पद्मभूषण श्याम सरेन आणि भारताचे माजी मुख्य न्यायाधीश दिपक मिश्रा यांनी सुद्धा कायद्याच्या चौकटीत राहून प्रशासकीय सेवा करण्याचा सल्ला दिला.


      सूत्रसंचालन प्रा. आसावरी फडके यांनी केले. प्र कुलगुरू प्रा.डी.पी. आपटे यांनी आभार मानले.