न्यूझीलंडमध्येही रंगणार आंतरराष्ट्रीय क्रिकेट, 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


न्यूझीलंडमध्येही रंगणार आंतरराष्ट्रीय क्रिकेट, 


मालिका खेळवण्यास सरकारची परवानगी....


न्यूझीलंड :- क्रिकेट बोर्डाला स्थानिक सरकारने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकांचं आयोजन करण्याची परवानगी दिली आहे. यामुळे न्यूझीलंडचा संघ आता घरच्या मैदानावर पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजविरुद्ध मालिका खेळणार आहे. सी.ई.ओ. डेव्हिड व्हाईट यांनी ही माहिती दिली. गेल्या काही महिन्यांपासून इंग्लंड क्रिकेट बोर्डाप्रमाणे न्यूझीलंड क्रिकेट बोर्डही 


सरकारी परवानगी मिळाल्यानंतर न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान आणि विंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी दोन्ही बोर्डांसोबत चर्चा सुरु केली आहे. आपल्या ट्विटर हँडलवर न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने ही माहिती दिली आहे. 


दोन्ही बोर्डांसोबत अंतिम बोलणी झाल्यानंतर दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर केला जाईल अशी माहिती न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने दिली आहे. आय.सी.सी.ने आखून दिलेल्या वेळापत्रकानुसार न्यूझीलंडचा संघ आपल्या देशात पाकिस्तान आणि विंडीजविरुद्ध कसोटी आणि टी-२० मालिका खेळणं अपेक्षित आहे.