'टाय' सामन्यात दिल्लीने पंजाबचा पराभव करुन यंदाच्या आयपीएलमध्ये थरारक सामना जिंकला.

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*



*'टाय' सामन्यात दिल्लीने पंजाबचा पराभव करुन यंदाच्या आयपीएलमध्ये थरारक सामना जिंकला.*


*दुबई : -* कमालीचा रंगतदार झालेल्या


'टाय' सामन्यात दिल्लीने पंजाबचा पराभव करुन यंदाच्या आयपीएलमध्ये थरारक सामना जिंकला. सुपर ओव्हरमध्ये रबाडाची भेदक गोलंदाजी दिल्लीच्या विजयात मौल्यवान ठरली. सुपर ओव्हरमध्ये रबाडाने तीन चेंडू पंबाजच्या राहुल आणि पुरन यांना बा- केले त्यामुळे दिल्लीला विजयासाठी स चेंडूत तीन धावा असे आव्हान मिळाले होते. पण शमीने एक चेंडू वाईड टाक आणि रिषभ पंतने दोन धावा करुन दिल्लीला विजयी केले.


पंजाबला विजयासाठी अखेरच्या 18 चेंडूत 42 धावांची गरज असताना अगरवालने 60 चेंडूत 89 धावांची अविस्मरणीय खेळी करुन सामन्याला निकाल बदलण्याच्या दिशेने वाटचाल केली. अगरवाल केएल राहुलसह सलामीला आला होता पण संघाचा विजयासाठी एका धावेची गरज असेप मैदानात होता पण तो अखेरच्या षटकातील पाचव्या चेंडूवर बाद झाला एक चेंडू एक धाव असे समीकरण असताना जॉर्डनही बाद झाला त्यामुळे सामना टाय झाला. दिल्लीच्या 157 धावांसमोर पंजाबची 5 बाद 55 अशी


अवस्था झाली होती या कठीण


परिस्थिनंतर अगरवालने बघता बघता सामन्यात रंग तर भरलेच पण आपलं संघाला विजयी पथावर आणले होते. त्याअगोदर स्टॉयनिसने 21 चेंडूत 53 धावांचा घणाघात सादर केला त्यामुळे दिल्लीने 157 धावा केल्या होत्या.


अश्विनने  पहिल्या षटकांत दोन विकेट मिळवले. परंतु चेंडू अडवताना त्याचा खांदा दुखावला. त्यानंतर तो मैदानात आला नाही.


संक्षिप्त धावफलक दिल्ली : 20 षटकांत 8 बाद 157 (श्रेयस अय्यर 39


-32 चेंडू, 3 षटकार, रिषभ पंत 31 -29 चेंडू, 4 चौकार, मार्कस स्टॉयनिस 53 -21 चेंडू, 7 चौकार, 3 षटकार, कॉट्रेल 24-2, मोहम्मद शमी 15-3) वि. पंजाब 20 षटकांत 8 बाद 157 (केएल राहुल 21 -19 चेंडू, 2 चौकार, 1 षटकार, मयांक अगरवाल 89 -60 चेंडू, 7 चौकार, 4 षटकार, रबाडा 28-2, अश्विन 2-2).